Advertisement

बायोमॅट्रिक हजेरीमुळे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वेळेवर भेटणार


नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक बसविण्याची मागणी:-बिरसा फायटर्स

नंंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी अशी मागणी गणेश खर्डे मलगाव उपाध्यक्ष-पुणे जिल्हा तथा कार्याध्यक्ष-नंदुरबार जिल्हा बिरसा फायटर्स महा,राज्य व राज्य उपाध्यक्ष:- जय रावण प्रतिष्ठान महा,राज्य यांनी श्री राजेंद्र मधुकर पाटील साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात म्हटले संदर्भ :- दि.14/01/2023 रोजीचे रत्नागिरी टाईम्स वृत्तपत्रातील वरील विषया संर्दभात प्रसिद्ध बातमी.
संदर्भ वाचा: क्र. संकीर्ण -2022/प्र. क्र.867/आस्था-7 दि. 5 जानेवारी 2023
 राज्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये असे निर्दशनास येत आहे कि ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांना अनेकदा कार्यालयात भेटत नाहीत त्यामुळे सर्व सामान्यांच्या कामाचा अणि वेळेचा खोळंबा होतो याला आवर करण्यासाठी आता कोकणातील ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी एका पत्राद्वारे राज्यातील कोकण,पुणे,नाशिक,औरंगाबाद,अमरावती, नागपुर,विभागिय आयुक्तांना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली लागु करण्याचे निर्देश दिले आहेत व प्रवेश द्वारावर जन माहीती अधिकारी फलक लावण्याबाबत सांगण्यात आले आहे.
तरी वरील संदर्भिय पत्राचा आशय लक्षात घेता आपल्या ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता येण्याच्या हेतूने व ग्रामसेवेकांच्या कार्यप्रणालीत सुधारणा व्हावी म्हणुन आपल्या ग्रामपंचातीमध्ये विनाविलंब बायोमॅट्रीक हजेरी प्रणाली बसविण्यात यावी अशी बिरसा फायटर्स महा,राज्य यांनी मागणी केली

Post a Comment

0 Comments