Advertisement

घोटाळेबाजाची ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनांना राज्य करता येणार नाही.

👉 घोटाळा नाही म्हणणारे गद्याची औलाद आहे. 

 👉 वामन मेश्राम यांच्या भाषणात आहे परिवर्तनाचा संदेश. 

गडचिरोली/ चक्रधर मेश्राम दि. १२ मार्च २०२३ :-
निवडणुकीत वापरली जाणारी ईव्हीएम मशीन हि घोटाळेबाजाची घोटळे मशीन असुन ईव्हीएम मशीनद्वारे होणारी हेराफेरी आणि प्रचंड भ्रष्टाचार नष्ट झाला पाहीजे. " व्होट हमारा , राज तुमारा नही चलेंगा." त्यासाठी ईव्हीएम मशीन हद्दपार केल्याशिवाय बहुजनांचे राज्य येणार नाही म्हणुन संघटित शक्तीच्या बळावर सुप्रिम कोर्ट आम्हाला न्याय मिळवून देवू शकतो यासाठी ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रवादी परिवर्तन यात्रा कन्याकुमारी ते काश्मिर पर्यत सतत सुरु राहणार आहे. सामाजीक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या बुद्धीजीवी व राजनैतिक नेत्यांना ईव्हिएम मशीनच्या गडबड घोटाळ्याची माहीती मिळत आहे. म्हणुन कांग्रेस आणि भाजपाने केलेले हे पाप धुवून काढून बहुजनांचे राज्य निर्माण करण्याकरीता ईव्हीएम घोटाळ्याची माहीती देत संपूर्ण देश ढवळून काढत आहे. ओबीसींची जनगणना झाली पाहीजे. खाजगीकरणाला आळा बसला पाहिजे त्यासाठी बहुजनांनी संघटीत होऊन लढा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन बामसेफ नेते वामन मेश्राम यांनी भारत मुक्ती मोर्चाच्या ईव्हीएम भंडाफोड परिवर्तन यात्रे प्रसंगी केले. ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन सभा इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक वामन मेश्राम यांचा उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी भन्ते सारीपुत , डॉ. गौतम नगराळे , अँड. माया जगदाळे दिल्ली , भारत मुक्ती मोर्चाचे गडचिरोली जिल्हा प्रमुख जर्नाधन तांकसाडे . रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर. विलास निंबोरकर. आनंद गावंडे , भागवत मॅडम आदीची ईव्हिएम मशीन घोटाळ्याबाबत समायोचित भाषणे झाली. याप्रसंगी डॉ. कुंभारे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की , बहुजनांच्या अनेक समस्या आहेत. त्या या माध्यमातून वामन मेश्राम यांनी सोडवून वंचित घटकांना न्याय मिळवून घ्यावा. कार्यक्रमाचे संचालन भोजराज कान्हेकर , प्रास्ताविक प्रा. अशोक वंजारी तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले भारत मुक्ती मोर्च्याच्या सभेला बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments