Advertisement

बुडकी येथे रा.से.यो.शिबारामार्फत शिबीरार्थींची उल्लेखनीय कामगिरी सिकलसेल आजार चाचणी व नियंत्रणावर जनजागृती.! व सेनेटरी नॅपकिन चे वाटप.

शिरपुर तालुक्यातील बुडकी येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.वि.संलग्नीत किसान विद्या प्रसारक संस्थेचे इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन बोराडी व जि.प.चे प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बुडकी, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र न्यु.बोराडी यांचे संयुक्त विद्यमाने सिकलसेल आजार चाचणी व नियंत्रण जनजागृती मोहीम राबविण्यात आली कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन बोराडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री.डॉ.संदीपजी वळवी, कोडीद चे समुदाय आरोग्य अधिकारी मा.श्री.डॉ.हिराजी पावरा, बुडकी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी मा.श्री.डॉ.अनंत पावरा, न्यु.बोराडी‌ उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी मा.श्री.डॉ.महेश पावरा तसेच बोराडी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास व्ही.पाटील, उपप्राचार्य कल्पेशकुमार एस.वाघ यांनी केले.
    मध्यान्ह सत्रात HIV विषाणू संदर्भात प्राचार्य डॉ.विकास पाटील यांनी जनजागृतीपर मार्गदर्शक केले. आपल्या दारी गावात घरोघरी सेनेटरी नॅपकिन चे वाटप शिबीरार्थींनींनी केले व दिवसाची सांगता प्रार्थनेनं झाली.
   या उल्लेखनीय कामगिरीचे संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाऊसो. तुषारजी रंधे, नानासो. निशांतजी रंधे, खजिनदार श्रीमती आशाताई रंधे, प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष आबासो राहुलजी रंधे, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन तात्यासो शशांकजी रंधे, संस्थेचे विश्वस्त शामकांत पाटील यांनी कौतुक केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास व्ही पाटील, उपप्राचार्य कल्पेशकुमार एस.वाघ, महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.रविकिरण सुर्यवंशी, श्री.विकास पाटील, प्रा.शितल राजपूत, प्रा. मयूर पाटील, प्रा. संदीप भोई, श्री.सागर सोनार, शिबीरार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिबीरार्थींनी कु.पल्लवी गिरासे,कु.गुंजन मराठे यांनी केले अशी माहिती जितेंद्र पावरा - नवागांव यांनी दिले

Post a Comment

0 Comments