Advertisement

समाजसेवा करणे सोपे नाही, स्वतःचा वेळ व पैसा खर्च करावा लागतो: सुशिलकुमार पावरा

रविवारची सुट्टीही समाजसेवेत;सुशिलकुमार पावरा यांना आदिवासी समाजासोबतच कुणबी व बौद्ध समाजाचाही वाढता पाठिंबा
दापोली:समाजसेवा करणे हे सोपे काम नाही.त्यासाठी स्वत:चा पैसा व वेळ खर्च करावा लागतो.समाजसेवा ही कोणतीही अपेक्षा न बाळगता फुकटात करावी लागते.समाज कार्य करताना यातना व कष्ट सहन करण्याची क्षमता असावी लागते.अपमान व निंदा पचवण्याचे सामर्थ्य असावे लागते.समाजसेवा करणे म्हणजे नवरसांना सामोरे जावे लागते.शृंगार, हास्य,करूण,रौद्र, वीर,भयानक, बीभत्स अशा नवरसांना सहन करावे लागते. समाजसेवा करणा-या माणसामुळे हजारों लोकांची भूक भागते,समस्या सुटतात.कोणत्याही समाजसेवकाचे काम हे समाजकार्य मोठे झाल्यावर दिसते.अहोरात्र लोकांना भेटणे,लोकांची मानसिकता समजून घेणे,लोकांच्या समस्या समजून घेणे,समस्या सोडवणे हे समाजसेवकाला सातत्याने करावे लागते.असे प्रतिपादन समाजसेवक सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केले आहे.
                     सुशिलकुमार पावरा हे बिरसा फायटर्स या आदिवासी समाजाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष असून आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र काम करत असतात.कोरोना काळात गरीब व गरजू आदिवासी बांधवांना अन्नधान्य व कपडे वाटणे,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटणे,गांवातील वीज, पाणी ,रस्त्यांचा प्रश्न शासनदरबारी मांडून सोडवणे.शासनाच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करणे,आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी काम करणे,आदिवासींचे आरक्षण वाचवणे,संस्कृतीचे जतन करणे,अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवणे,न्यायिक लढाई लढणे,उपोषण, आंदोलन व मोर्चा काढणे,ही कामे सुशिलकुमार पावरा आपल्या संघटनेच्या माध्यमातून अहोरात्र करीत आहेत.ही कामे अत्यंत जबाबदारीने व निर्भीड पणे करीत आहेत. अनेकदा कठीण प्रसंग आले,तरी सुशिलकुमार पावरा यांनी आपली रक्तात असलेली समाजसेवा सोडलेली नाही.सुशिलकुमार पावरा यांना समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन 2021 चा इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्डने नाशिक येथे आफ्रीकन समाजसेवक व मिस युनिव्हर्स यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. सुशिलकुमार पावरा यांची 400 वेळा उपोषण करणारे उपोषणकर्ता,आंदोलनकर्ता,समाजसेवक, 
शिक्षक, गायक,नृत्यक, लेखक, कवी,कराटेपटू,राष्ट्रीय कला मित्र ,आदिवासी कलाकार, 
राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स अशी विशेष ओळख आहे.Tik Tok star म्हणूनही सुशिलकुमार पावरा हे प्रसिद्ध झाले होते.
               आदिवासी समाजासोबतच आता दापोली तालुक्यात व रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांत बौद्ध व कुणबी समाजाची लोकही सुशिलकुमार पावरा यांची मदत घेऊ लागली आहेत.बहुतेक कर्मचारी हे रविवारची सुट्टी आपल्या कुटुंबासाठी घालवतात, पण याला सुशिलकुमार पावरा हे अपवाद ठरले आहेत.रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुशिलकुमार पावरा यांनी महाळूंगे या गांवातील वस्तीत जाऊन बौद्ध व कुणबी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या.जामगे गांवातील आदिवासी कातकरी व कुणबी बांधवांचा स्मशानभूमीचा प्रश्न शासनदरबारी सुटावा म्हणून निवेदन देत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. समस्या सोडवण्यासाठी शक्य ती मदत करत आहेत.त्यामुळे सुशिलकुमार पावरा यांना आदिवासी समाजासोबतच बौद्ध व कुणबी समाजाचाही साथ व पाठिंबा मिळु लागला आहे.

Post a Comment

0 Comments