Advertisement

ग्रामसभा हि गावाची विकासाकडे जाण्यासाठीचा मुख्य मार्ग आहे.- प्रदीप वाघ


 तिन दिवसीय प्रशिक्षण शिबीर

पालघर :प्रतिनिधी सौरभ कामडी 


आज मोखाडा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आले होते यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की आपल्या ग्रामपंचायत मधील विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, तसेच ग्रामसभेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घ्या. प्रत्येक लोकप्रतिनिधी नी योजनांची माहिती व कायद्याचा  अभ्यास करून काम केली तर आपण अधिक प्रभावी अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा  प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली.
यावेळी गोखले एज्युकेशन कोसंबाड चे प्राचार्य  पाटकर, श्री अंबात सर, पंचायत समिती सदस्य  युवराज गिरंधले,  तुषार सुर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी, श्री आर.के.गवारी, पंचायत समिती विस्तार अधिकारी, श्री राजा कोरडे पेसा समन्वयक, श्री अरविंद शिंदे कक्ष अधिकारी 
तसेच सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments