Advertisement

आदिवासींना स्मशानभूमीसाठी जागा द्या : बिरसा फायटर्सची मागणी

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

बोअरवेलसाठी परवानगी दिली;स्मशानभूमीसाठी परवानगी का नाही? ग्रामस्थांचा सवाल

दापोली: जामगे- विसापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणा-या बेंद्रेवाडी,कातकरवाडी,नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीसाठी जामगे- विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी संपादित केलेल्या धरणाच्या खालील बाजूस शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी मृदा व जलसंधारण उपविभाग दापोली यांना बिरसा फायटर्स संघटनेने दिनांक 14/02/2023 रोजी दुपारी 12 निवेदन दिले. निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,कृष्णा हिलम,भिकाजी तांबट आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
             स्मशानभूमीच्या मागणीसाठी उपविभागीय कार्यालय दापोली समोर बिरसा फायटर्सचे जामगे विसापूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिनांक 17 फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन होणार आहे.या आंदोलनाचे निवेदन दापोलीचे उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी आर.एम.दिघे यांनाही देण्यात आले आहे.
                  उपविभागीय जलसंधारण अधिकारी,मृदा व जलसंधारण उपविभाग दापोली यांचे दिनांक 22/11/2021 रोजीचे पत्रान्वये ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीसाठी पूर्वीपासून असणा-या स्मशानभूमीच्या जागेवर स्मशान शेड बांधण्यास मनाई केली आहे.शासनाकडून स्मशानशेड बांधण्यासाठी साडे तीन लाख रूपये मंजूर झालेले असले तरी स्मशानशेड बांधण्यास मनाई असल्यामुळे सदर रक्कम परत जात आहे. स्मशानशेड नसल्यामुळे गावात होणा-या मृत व्यक्तींच्या प्रेताची अंत्यसंस्कार करण्यात हेळसांड होत आहे. पावसाळ्यात स्मशानशेड अभावी प्रेत जळत नाही,अंत्यविधी करण्यास अडचण येणे,लोकांना पावसात भिजत उभे राहावे लागते इत्यादी एकंदरीत अंत्यसंस्कार करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.तसेच सदर जागेवर प्रेत जाळण्यास मनाई केल्यामुळे आता प्रेत जाळायचे कुठे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
                  गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांच्या दिनांक 23/01/2023 पत्रानुसार स्मशानशेड बांधण्यास 3.50 लाख रूपये रक्कम मंजूर केल्याबाबतचे पत्र सरपंच/ग्रामसेवक विसापूर यांना देण्यात आले आहे.
                 तरीही जामगे -विसापूर येथील 4 वाड्यातील मयत व्यक्तींचे पूर्वीपासून प्रेत जाळून अंत्यसंस्कार करत असलेल्या जागेवर स्मशानशेड बांधण्यास ग्रामस्थांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी ,मृदा व जलसंधारण उपविभाग दापोली यांच्याकडून अद्यापही परवानगी दिली जात नाही.सदर ठिकाणी स्मशानशेड बांधण्यास अडचणी निर्माण केल्या जात आहेत. या गांवातील लोकांनी आत प्रेत कुठे जाळायचे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर स्मशान शेड बांधण्यास परवानगी देऊन प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.बोअरवेलसाठी परवानगी देण्यात आली मात्र स्मशानशेड बांधण्याच्या कामात राजकीय लोक अडथडे निर्माण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments