Advertisement

कृषी अभियंत्यांचे ठिय्या आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच...

26 जानेवारीपासून कोकण कृषी विद्यापीठ दापोलीसमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या

दापोली: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे सातव्या दिवशी ही प्रशासकीय कार्यालयासमोर कृषी अभियंत्यांचे खालील मागण्या साठी बे मुदत राज्य व्यापी ठिय्या आंदोलन सुरूच आहे.
1.कृषि अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषि सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबावे आणि या दोन्ही परीक्षेला तात्काळ स्थगिती द्यावी .
 2. राज्यांमध्ये कृषि अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे . 
3. मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषि अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी .
 4. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून इतर शाखेच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषि अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा .अशा मागण्यांसाठी सहाव्या दिवशीही हे ठिय्या आंदोलन सुरूच आहे.

Post a Comment

0 Comments