Advertisement

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या अजलान काद्रीचे सुयश

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाचा प्रथम वर्षेय विद्यार्थी कु. अजलान शाहीर काद्री याने मुंबई विद्यापीठ अंतर्गत ठाणे झोन व एस. एस. टी. महाविद्यालय उल्हासनगर आयोजित घेण्यात आलेल्या आंतर विभागीय शरीर सौष्ठ स्पर्धेत सुवर्णपदकावर आपला ठसा उमटवला. अजलानची मुंबई विद्यापीठाच्या बेस्ट फिझीक संघामध्ये निवड झाली आहे. आता आंतर विद्यापीठीय बेस्ट फिझीक स्पर्धेत अजलान मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
   त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ अंतर्गत ठाणे झोन व मातोश्री वेलबाई देवजी हरिय्या डिग्री महाविद्यालय, शहड येथे पार पडलेल्या आंतर विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुद्धा अजलानने बाजी मारत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.
   अजलानच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, विविध उपक्रमांचे समन्वयक प्रा. संतोष मराठे, महविद्यालयाच्या क्रिडा संचालिका प्रा. निधी भडवळकर, प्रा. नंदा जगताप, प्रा. प्रियांका साळवी, प्रा. शंतनु कदम, प्रा. अनिकेत नांदिस्कर, प्रा. सिद्धी साळगावकर, प्रा. सुजित पवार, प्रा. दिपाली नागवेकर यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments