Advertisement

प्रदीप वाघ आपण येता तेंव्हा च आमची दिवाळी साजरी होते

 पालघर,प्रतिनिधी (सौरभ कामडी )
बॅक अॉफ इंडिया अधिकारी संघटना मुंबई आणि गोवा यांच्या कडुन मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाकडपाडा येथील विद्यार्थ्यांना मिठाई व सोलापूरी चादरीचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की गेल्या तीस वर्षा पासून आपण सातत्याने शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी च्या निमित्ताने मिठाई वाटप करता,या वेळी आपण उशिरा का होईना आलात हिच आमच्या विद्यार्थ्यां साठी दिवाळी असुन आपण सातत्य कायम ठेवले आहे.तसेच ऐन थंडीत आपण सोलापुरी चादर विद्यार्थ्यांना दिली आहे तिचा देखील फायदा होईल असे ही प्रदीप वाघ यांनी सांगितले व अधिकारी संघटनेचे आभार मानले.
यावेळी श्री सावे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अधिकारी संघटना कायम आपल्या सोबत आहे आपण अभ्यास करा असा सल्ला त्यांनी दिला.
अधिकारी संघटनेचे सचिव श्री निलेश पवार साहेब यांची बॅक राष्ट्रीय फेडरेशन च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.श्री पवार यांनी सांगितले की भविष्यात शाळेच्या कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास संपर्क साधावा ती सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री नंदकुमार वाघ उपसरपंच, श्री गणेश खादे ग्रामपंचायत सदस्य,सौ सोनाली पाडेकर ग्रामपंचायत सदस्य, श्री विलास फसाळे, नरेंद्र वाघ,हर्षदा खादे ग्रामपंचायत सदस्य,शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनकर सर, निलेश गांगवे,संदानंद भेरे, शाळेचे माजी शिक्षक श्री लाला साहेब धायगुडे, केंद्र प्रमुख श्री विरकर सर ,शाम फसाळे, संतोष पाटील,मोहन पाडेकर, अशोक वाघ, नितीन पिठोले, नितीन वाघ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments