Advertisement

धनगर हे आदिवासी नाहीत: सुशिलकुमार पावरा

*धनगर व धनगड ह्या दोन भिन्न जाती:टिस(टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) चा अहवाल* 

*बिरसा फायटर्स आक्रमक, आंदोलनाचा इशारा*

*सुप्रिया सुळेंचा पुतळा जाळत धनगर नेत्यांना व संघटनांना दणका देऊ: बिरसा फायटर्स*
 *खासदार राजेंद्र गावित यांनी समाजासाठी कौतुकास्पद काम केले: सुशिलकुमार पावरा*
रत्नागिरी:आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करू नका,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन दापोलीचे नायब तहसीलदार शरदकुमार आडमुठे यांना देण्यात आले.यावेळी शांताराम जाधव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, काळूराम वाघमारे पंचायत समिती सदस्य,विश्वास गोगरेकर, धोंडू पवार, आशा जाधव, अर्चना मुकणे,सुरेखा गोगरेकर, शुभांगी वाघमारे,सुशिलकुमार पावरा सह असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
                 निवेदनात म्हटले आहे की,आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक हक्क असून त्यामध्ये कोणत्याही अन्य जातीची घुसखोरी करू नये.धनगर समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश करण्यात यावा,म्हणून आपणाकडे व शासनस्तरावर मागणी केली जात आहे.धनगर समाजाला घटनेनुसार 3.5% स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे. धनगर व धनगड ह्या दोन भिन्न जाती आहेत, त्यामुळे धनगरांना अनुसूचित जमातीत आरक्षण देता येणार नाही,असा अहवाल टिस ( टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ) ने अहवाल शासनाकडे दिलेला आहे.असे असताना धनगरांना अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी करणे चूकीचे आहे.तसेच आदिवासींची संस्कृती ही विशिष्ट व स्वतंत्र आहेत.आदिवासींची संस्कृती ही धनगर समाजाशी मिळतीजुळती नाही.आदिवासी समाजाची रितीरिवाज, रूढीपरंपरा,भाषा,जीवनशैली स्वतंत्र आहे. आदिवासी समाज व धनगर समाज हे दोन वेगवेगळे समाज आहेत.आदिवासी समाजाचा व धनगर समाजाचा कुठल्याही बाबतीत ताळमेळ बसत नाही.
                       आदिवासी समाजाला ख-या अर्थाने 7% आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही,कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची,बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे.खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांआधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या लाखो नोक-या हडप केल्या आहेत. अशा एकूण 75 हजार बोगस कर्मचाऱ्यांना सेवासंरक्षण देण्याचा निर्णय दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी शासनाने घेतला,त्या निर्णयाचा राज्यभर आदिवासी समूहाकडून तीव्र विरोध होत आहे.गैर आदिवासींनी अनेक श्रेत्रात आदिवासी आरक्षणाचा गैर फायदा घेतलेला आहे व घेत आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या प्रगतीस अडथडा निर्माण होत आहे.आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे. म्हणून आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.
               आदिवासी खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभेत आदिवासींची खरी बाजू मांडून कौतुकास्पद समाजकार्य केले आहे.काही धगनर नेते व संघटना खासदार राजेंद्र गावित यांचा हिंसाचाराने विरोध दर्शवत आहेत.खासदार सुप्रिया सुळे ह्या सुद्धा धनगरांची बाजू धरत आहेत, म्हणून सुप्रिया सुळे यांचा आम्ही पुतळा जाळणार आहोत व धनगर नेत्यांना व संघटनांना सुद्धा कायदेशीर दणका देणार आहोत, असा इशारा सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments