Advertisement

बोगस जात चोरांना बाहेर काढून खऱ्या आदिवासींना नोकऱ्या द्या

*जय रावण प्रतिष्ठाण महा- राज्य संघटनेकडून धुळे तहसीलदारांना निवेदन*

धुळे (प्रतिनिधी) - 29 नोव्हेंबर 2022 रोजी आदिवासी विरोधी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय रद्द करण्यातबाबत आज दिनांक :- ०६ डिसेंबर २०२२ रोजी धुळे येथील नायब तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात म्हटले आहे की ज्या बोगस जात चोरांनी आदिवासींच्या जागा बळकवून गुन्हेगारी कृत्य केले त्यांची त्या त्या पदावरून ताबडतोब हाकलपट्टी करून त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कारवाई करावी बोगसांना अधिसंख्य पदावरून नेमणूक देण्याचे बेकायदेशीर धोरण रद्द कराने, 29 नोव्हेंबर 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ निर्णया निर्णयाद्वारे बोगसांना सेवा विषयक लाभ देण्याचा निर्णय रद्द कराना, अजूनही विविध नियम शासकीय आस्थापना व शिक्षक संस्थेमध्ये अनेक बोगस कार्यरत आहेत़, त्यांचा राजव्यापी आढावा घेऊन त्या जागा रिक्त करून घ्याव्यात सर्व रिक्त जागांवरील पदांच्या जाहिराती काढून खऱ्या आदिवासी तरुणांना नोकरीत समावेश करणे, अन्यथा असे न केल्याने जय रावण प्रतिष्ठाण तर्फे सर्व महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्य प्रसिद्धी प्रमुख- मा.जलिंदर पावरा यांनी सांगितले.
त्यावेळी निवेदन देताना धुळे जिल्हा अध्यक्ष- योगेश गायकवाड, धुळे जिल्हा उपाध्यक्ष संदिप सोनवणे, जिल्हा संघटक-किरण पारधी, तालुका प्रमुख-धनंजय गांगुर्डे, तालुका कार्याध्यक्ष-मोनू सोनवणे, तालुका सदस्य-अक्षय बागुल यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments