Advertisement

युवांचा विश्वास फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेवर !!

महाराष्ट्राचे युवा खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते युवासेनेचे पुणे जिल्हा चिटणीस वैभव ढोकले, युवासेनेचे शिरूर समन्वयक वैभव खेडकर व अजित शिंदे सरकार यांनी मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपल्या समर्थकांसह आज #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात नंदनवन, मुंबई येथे जाहीर प्रवेश केला. या सर्व पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी सामनामधून नियुक्ती करण्यात आली होती.
डॉ.श्रीकांतजी शिंदे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी युवासेना सचिव पुर्वेशजी सरनाईक, किरण साळी, युवासेना राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर,  युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, युवासेना आंबेगाव तालुकाप्रमुख वैभव पोखरकर, युवासेना रांजणगाव शहरप्रमुख अक्षय खेडकर व अनिकेत खेडकर यांच्यासह शिरूर लोकसभा मतदार संघातील युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments