Advertisement

राज्याच्या ग्रामीण राजकारणात बिरसा फायटर्सचे यश

*तिस-या टप्प्यात 9 सरपंच निवडून आल्याचा दावा*

*पहिल्या टप्प्यात 13,दुस-या टप्प्यात 2,तिस-या टप्प्यात 9,एकूण 24 सरपंच विजयी*

*बिरसा फायटर्सचे ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश*

*दिलीप पावरा,वरझडी ग्रामपंचायत सरपंच, बिरसा फायटर्स*

रत्नागिरी: बिरसा फायटर्स या आदिवासी समाजाच्या सामाजिक संघटनेने राज्याच्या ग्रामीण राजकारणात आपले यश संपादन केले आहे.तिस-या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिरसा फायटर्स संघटनेचे गोंदिया जिल्ह्य़ात 8 व धुळे जिल्ह्य़ात 1 असे एकुण 9 सरपंच उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे.यात धुळे जिल्हा सल्लागार दिलीप पावरा हे शिरपूर तालुक्यातील वरझडी गांवाचे सरपंच म्हणून निवडून आले तर गोंदिया जिल्ह्य़ात साकोली,तिरोडा तालुक्यात एकुण 8 उमेदवार निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीत बिरसा फायटर्सचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप पवार हे कुडावळे ग्रामपंचायतीत निवडणूक लढवली त्यांना 125 मते मिळाली असून ते पराभूत झाले आहेत. 
                   ग्रामपंचायत 2022 निवडणुकीत बिरसा फायटर्सचे पहिल्या टप्प्यात 13,दुस-या टप्प्यात 2 ,तिस-या टप्प्यात 9 असे एकुण 24 सरपंच उमेदवार विजयी झाले आहेत.बिरसा फायटर्स या नव्या संघटनेने ग्रामपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार निवडून घवघवीत यश संपादन केले आहे.त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील राजकारणात बिरसा फायटर्सने प्रवेश केला आहे.निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी अभिनंदन केले आहे.त्याचबरोबर बिरसा फायटर्सच्या पदाधिकाऱ्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षांत करण्यात आला आहे.
         बिरसा फायटर्स ही सामाजिक संघटना असून काही राजकीय पक्षांना मागे टाकत ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारत आहे,म्हणून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत.राज्याच्या निवडणुकीत बिरसा फायटर्सच्या उमेदवारांना पसंती मिळू लागल्यामुळे आता पुढच्या निवडणुकीकडे लोकांचे लक्ष लागले आहेत.

Post a Comment

0 Comments