Advertisement

मोखाडा नगरपंचायत साठी 34.77कोटी पाईप लाईन साठी अखेर निधी मंजुरी

पालघर प्रतिनिधी:सौरभ कामडी 
 

मोखाडा नगरपंचायत साठी 
बहुचर्चित व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला अखेर आज मंजूरी देण्यात आली असून 34.77 कोटी रु.एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.त्यामुळे मोखाडा शहर व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व गावपाडे यात समाविष्ट करण्यात आले असून या योजने मुळे संपूर्ण नगरपंचायतील नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे,व शुद्ध व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना या योजनेचा पाठपुरावा करणारे व मोखाडा नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री अमोल पाटील यांनी सांगितले की, ‌गेले कित्येक वर्षे या योजनेचा पाठपुरावा केला जात होता पंरतु शासनाच्या जाचक अटी शर्ती पुर्ण करणे,या मध्ये अगदी जागा उपलब्ध, पाणी आरक्षण, आदिवासी उपयोजनेत समाविष्ट करणे, फिल्टर प्लॅन्ट साठी जागा, घनकचरा व्यवस्थापन, इत्यादी अनेक बाबींचा मागील काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास विभाग,महसुल विभाग, आदिवासी विकास विभाग, पाणी पुरवठा विभाग,वित्त विभाग या कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला जात होता.
अखेर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द पुर्ण करत आम्हाला हि योजना मंजूर करुन दिली असुन मी आपल्या माध्यमातून मानणीय मुख्यमंत्री महोदयांचे मोखाडा नगरपंचायत व नगरपंचायत च्या तमाम जनेतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो.
तसेच या योजनेचा पाठपुराव्या साठी सहकार्य करणारे मानणीय पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब,मानणीय नामदार दादाजी भुसे साहेब, संपर्क प्रमुख‌आमदार श्री रविंद्र फाटक साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री प्रकाश निकम साहेब,मानणीय आमदार श्री सुनील भाऊ भुसारा साहेब, खासदार श्री राजेंद्र गावित साहेब, जिजाऊ संघटेचे अध्यक्ष श्री निलेश सा़बरे साहेब, उपनगराध्यक्ष श्री नवसु दिघा यांनी वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य केले.म्हणुन हि योजना मंजूर करण्यात यश मिळाले आहे,तसेच सर्व आजी नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व आजी माजी नगरपंचायत चे सभापती, सर्व लोक प्रतिनिधी, सर्व
 अधिकारी यांना देखील मना पासून धन्यवाद देतो.

Post a Comment

0 Comments