जय रावण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही संघटना आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ह्या संघटनेची निर्मिती करण्यात आली आहे, आदिवासी समाजातील तरुणांचा आवाज बुलंद करण्याकरिता ही संघटना कार्यरत राहणार आहे.
तर जळगांव जिल्हाध्यक्ष पदी प्रवीण पावरा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल पारधी व राज्य सचिव अजय पारधी हे उपस्थित होते.
यावेळी नवीन तालुका कार्यकारणीचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नूतन अध्यक्ष साहेबराव पावरा यांनी सर्व पदाधिकारी बरोबर घेऊन आपण आदिवासी समाजाच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता सातत्याने प्रयत्नशील राहू,अशी ग्वाही दिली
0 Comments