Advertisement

बिरसा मुंडा जयंतीवर ठानेगाव येथे दुर्गावती फायटर्स मंचातर्फे समाजप्रबोधन

छाया दिलीपकुमार मडावी से नि शिक्षिकांचे बिरसा फायटर्सतर्फे सत्कार व समाजप्रबोधन 


 तिरोडा:(१८ नोव्हें.) शहिद वीर बिरसा मुंडाच्या १४७ व्या जयंती चे अौचित्य प्रबोधन मेळाव्याचे आयोजन ठानेगांव येथे केले.या 
प्रसंगी उदघाटक सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच छायाताई दिलीपकुमार मडावी विदर्भाध्यक्ष दुर्गावतीमंच यांचे अध्यक्षतेखाली उत्सव पार पडले तेव्हा मंचावर दिपप्रज्वलन सौ. संध्या खंडाते शिक्षिका शहीद मिश्रा काँलेज , त़िरोडा,प्रमुख अतिथी -दिलीप कुमार मडावी,देवेंद्र डी.खंडाते, विदर्भ संरक्षक,भोजराज उईके, जिल्हाध्यक्ष गोंदिया,संस्कार पिठावर अध्यक्ष मडावी यांनी, शिका,संघटीत व्हा,व संघर्ष करा असे आवाहन केले.
"एकमेकांशी सह्याय करू,अवघे धरू सुपंथ असे विचार मांडले.उदघाटक पंधरे यांनी महामंडळातील बस कर्मचारी हे मानव समुह जीवना तील डाँक्टरपेक्षा जीवन मरणाचे एक लोकवाहक म्हणुन कार्यरत सरकारने त्यांचे वेतन वाढवून देत संरक्षण करावे. असे ठानेगाव व तिरोडा बसआगार मध्ये संयुक्तिक पणे संबोधन केले.
आदिवासी रुढी चाली रिती,परंपराचे ज्ञान करीन देने घेने,- ज्ञान करून देने घेने व प्रबोधन करने.कायदेतज्ञ व समाजसेवकां चे काम गावातील नवनवे बिरसा मुंडा तयार करा असे प्रतिपादन करण्यात आले याप्रसंगी सुरेश - कुमार पंधरे या़ंनी शैक्षणिक, धार्मिक सामाजिक,राजकीय उलगुलानाची जाणीव व संज्ञा करतानी संपुर्ण क्रांती नव्याने करा असे आवाहन केले.याप्रसंगीवेळी संस्कार पिठावरून प्रमुख अतिथी सौ.संध्याजी खंडाते वंदनाजी धुर्वे शिक्षिका,यांनी समाजप्रबोधनपर केले प्रास्ताविक-कैलासजी मरस्कोल्हे गाव शाखा बिरसा फायटर्स अध्यक्ष व आभार व समारोप कर्मचारी संघातर्फे एक्स झेड मरस्कोल्हे सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments