Advertisement

विश्व मानव रूहानी केंद्र पिंपळनेर मार्फत मोफत आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजन करण्यात आले

 पिंपळनेर :-विश्व मानव रुहानी केंद्र, नवानगर नोंदणीकृत एक संपूर्ण लाभकारी परोपकारी आणि अध्यात्मिक संस्था आहे ही संस्था संत बलजीतसिंग यांनी शिकवलेला नैतिक जीवन अध्यात्म आणि ध्यानधारणा यावर आधारित कार्यक्रम तसेच लोक कल्याणासाठी विविध प्रकारच्या सामाजिक कार्यांचे आयोजन करते.जागतिक महामारीच्या काळातील विविध राज्यांमध्ये संस्थेमार्फत धर्मदाय कार्य उत्साहाने आयोजित करण्यात आले होते, तसेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. याच अनुषंगाने पिंपळनेर परिसरातील गरजूंना आव्हान केले गेले होते.

 या उपक्रमात दि.१३ नोव्हेंबर छाईल येथे ७६ रुग्ण लाभार्थी, दि. २० नोव्हेंबर हारपाडा येथे ६२ रुग्ण लाभार्थी, दि.२७ नोव्हेंबर पिंपळनेर केंद्रात ९० रुग्ण लाभार्थी यांचे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आला.
यावेळी डॉक्टर फार्मासिस्ट व विश्व मानव रुहानी केंद्र, पिंपळनेर येथील सेवादारांनी आनंदाने सेवा केली.

Post a Comment

0 Comments