Advertisement

बिरसा फायटर्स तर्फे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरा

*कोकण विभाग अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी केले प्रबोधन* 
मुरबाड:मुरबाड येथील उगळेआळी ‌(कोळीवाडा) येथे बिरसा फायटर्स संघटना मुरबाड यांच्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करत असताना बिरसा मुंडा चौकाचे अनावर फलकाचे उध्दघाटन मुरबाड नगरध्याश रामभाऊ दुधाळे व मुरबाड पोलिस स्टेशन चे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोनजे साहेब यांच्या उपस्थितीत अनेक आदिवासी महिला, पुरूष यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात साजरा झाला असुन मध्ये नायब तहसीलदार, श्री राकेश दाभाडे साहेब,गोवारी, आढारी ठोसरे, मार्के, अशोक भोईर, नरेंद्र जाधव, विठ्ठल डामसे संतोष भोईर, गौरव शेलार, कुणाल शेलार, राहुल डामसे बाळा कंरवदे अरुण शेलार,अजय भोईर पिंट्या भोईर, योगेश जाधव, कविता भोईर,लिना भोईर, उज्वलाताई महाजन, रेश्मा शेलार, भुरी ताई डामसे इंदुताई चातुर्य जयश्री शेलार छबीताई शेलार भोईर नानी आढारीताई, गोवारीताई, सुपे ताई आदिवासीं महिला पुरुष स्वतः सहभागी होऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरा केला सदर जयंती साजरी करत असताना संविधान प्रास्ताविकाचेफलक, लावुन जागृती करण्यात आली.
                  यावेळी बिरसा फायटर्सचे कोकण विभाग अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.जय बिरसा! जय जोहार!जय आदिवासी ! असा कार्यक्रमात नारा देण्यात आला.

Post a Comment

0 Comments