Advertisement

इटवाई येथे बिरसा फायटर्सची ३१६ शाखेचे उदघाटन (तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी तर शाखाध्यक्ष म्हणून सचिन पाडवी यांची नियुक्ती)

अक्कलकुवा(प्रतिनिधी)राज्यात बिरसा फायटर्स ही एक सामाजिक संघटना आहे.इटवाई( ता. अक्कलकुवा) येथे ३१६ नवीन शाखेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष भरत पावरा यांनी शिक्षण व आदिवासी अमूल्य संस्कृतीवरील आक्रमण राखून संस्कृतीचे रक्षण,संवर्धन यावर मार्गदर्शन केले.विभागीय प्रवक्ता दयानंद चव्हाण यांनी बिरसा फायटर्स संघटनेचे उद्देश,आतापर्यत केलेली कामे,ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.संघटनेचे महत्व,आदिवासी संघटित झाला तर अनेक प्रश्न सुटतील.यासाठी संघटित राहा असे आवाहन जिल्हा संघटक यशवंत वळवी यांनी केले.यावेळी नवीन कार्यकारणी घोषित आली.तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,शाखाध्यक्ष(इटवाई,कंकाळा, पोहर)सचिन पाडवी,उपाध्यक्ष रणजित वसावे,सचिव हिरालाल वसावे, कार्याध्यक्ष धरमसिंग पाडवी,सल्लागार धरमसिंग बु. पाडवी,संघटक स्वप्निल पाडवी, कोषाध्यक्ष सुनील पाडवी,निरीक्षक निलेश पाडवी,सहसंघटक सुनील पाडवी,प्रसिद्धीप्रमुख दिनेश पाडवी, महिला प्रतिनिधी शांतिबाई पाडवी सदस्य म्हणून ईश्वर वसावे,अड,उषा वसावे,शंकर पाडवी,रवीसागर पाडवी,आनंद पाडवी,अभिमन्यू पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली.आभार मानसिंग पाडवी यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments