शहादा: विश्व मानव रूहानी केंद्र, नवानगर नोंदणीकृत संस्थेमार्फत अध्यात्मिक व परोपकार जपला जातो. जात धर्म पंथ वर्ण रंग भेदभावाशिवाय संस्थेचे देशपातळीवर कार्य चालत असते. या संस्थेचे मुख्यालय हरियाणा राज्यातील नवानगर (नानकपुर) तालुका कालका जिल्हा पंचकुला येथे आहे. या संस्थेमार्फत सामाजिक सेवा कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय तपासणी शिबिरांचे, शैक्षणिक शालेय सामग्री, अशा विविध मानव सेवा करण्यात येतात. या संस्थेमार्फत शहादा मोहिद्या व तालुक्यातील रहिवाशांना आवाहन करण्यात येते की दि. ०३ ऑक्टोंबर २०२२ रोजी मा. मोहिदा व दि. ४ ऑक्टोंबर २०२२ रोजी अनरद बारी शहादा येथे मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे सूचना विश्व मानव आणि केंद्र नवानगर, सेंटर शहादा मार्फत करण्यात आलेले आहे.
0 Comments