Advertisement

बिरसा फायटर्सच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी शशिकांत निकम यांची निवड

रत्नागिरी: बिरसा फायटर्सच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी शशिकांत निकम यांची नुकतीच निवड करण्यात आली.शशिकांत निकम यांनी सुशिलकुमार पावरा यांच्या सामाजिक कामाला प्रभावित होऊन बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानंतर सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी शशिकांत निकम यांची जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी यांच्याशी चर्चा करून उपाध्यक्ष पदी निवड केली.
           दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दापोलीतील आक्रोश मोर्चा व आंदोलनात शशिकांत निकम यांनी आपल्या चिपळूण मधील हजारों आदिवासी बांधवांसह सहभाग नोंदवला होता.त्याच दिवशी सुशिलकुमार पावरा यांनी दापोलीत गोल्ड व्हॅलीत शशिकांत निकम यांना शुभेच्छा देत सत्कार केला.
          शशिकांत निकम हे एक सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजाचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत.ते आदिम आदिवासी कातकरी संघटनेचे चिपळूण तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होते.
         शशिकांत निकम यांची बिरसा फायटर्सच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष, संदीप पवार कार्याध्यक्ष, चंद्रभागा पवार राज्य महिला प्रतिनिधी व राज्यातील बिरसा फायटर्सच्या पदाधिकारी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.शशिकांत निकम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments