Advertisement

बिरसा फायटर्सच्या चिपळूण तालुकाध्यक्ष पदी सुरेश पवार तर सचिव पदी अक्षय निकम


*चिपळूण तालुक्याचे हजारों कार्यकर्ते बिरसा फायटर्स मध्ये* 

रत्नागिरी: बिरसा फायटर्सच्या चिपळूण तालुकाध्यक्ष पदी सुरेश पवार यांची निवड करण्यात आली आहे.तर तालुका सचिव पदी अक्षय निकम यांची निवड करण्यात आली.सुरेश पवार, अक्षय निकम सह चिपळूण मधील हजारों आदिवासी कार्यकर्त्यांनी सुशिलकुमार पावरा यांच्या सामाजिक कामाला प्रभावित होऊन बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.त्यानंतर सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी सुरेश पवार निकम यांची चिपळूण तालुकाध्यक्ष पदी निवड केली व सचिव पदी अक्षय निकम यांची निवड केली.तसेच उर्वरित चिपळूण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
           दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दापोलीतील आक्रोश मोर्चा व आंदोलनात चिपळूण मधील हजारों आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला होता.त्याच दिवशी सुशिलकुमार पावरा यांनी दापोलीत गोल्ड व्हॅलीत सुरेश पवार व अक्षय निकम यांना  शुभेच्छा देत सत्कार केला.
             सुरेश पवार व अक्षय निकम  हे  रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजाचे तरुण सामाजिक कार्यकर्ते आहेत.हजारों तरुण मंडळी बिरसा फायटर्सच्या चिपळूण टीममध्ये शामिल झाले आहेत. 
         सुरेश पवार यांची बिरसा फायटर्सच्या चिपळूण तालुकाध्यक्ष पदी व अक्षय निकम यांची सचिव पदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष, संदीप पवार कार्याध्यक्ष, चंद्रभागा पवार राज्य महिला प्रतिनिधी व राज्यातील बिरसा फायटर्सच्या पदाधिकारी सदस्यांनी अभिनंदन केले आहे. चिपळूण तालुक्यातील बिरसा फायटर्सच्या नवीन टिमवर आदिवासी बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments