Advertisement

बोगस अधिका-यांना बडतर्फ करा

*शिक्षक पावरा यांचा उपोषणाचा लढा सुरूच* 

दापोली: बोगस व दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करा,असा नारा देत शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपला उपोषणाचा लढा सुरूच ठेवला आहे.दोषी,भ्रष्टाचारी,षडयंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारक विजय दाजी बाईत व बोगस डिग्रीधारक नंदलाल कचरू शिंदे या दोन शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31 दोषारोपित तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मुळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा 28 मागण्यांसाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दापोलीत आपले 366 वे उपोषण छेडले आहे.
             विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांनी खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली व अनेक गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल त्रिसमीतीय चौकशी समितीने दिला आहे.तसेच नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची पदवी शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी ग्राह्य धरता येणार नाही,असा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिला आहे.तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यावर 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहेत. 
                   दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अधिका-यांना मंत्री व राजकीय पदाधिकारी पाठीशी घालतात.म्हणून त्यांच्यावर अद्याप कारवाई होत नाही. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माझी उपोषण मी सुरूच ठेवणार आहे अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते सुशिलकुमार पावरा यांनी उपोषण स्थळी दिली आहे.

Post a Comment

0 Comments