Advertisement

कोपरगाव - तालुक्यातील वेळापूर येथे पावसाच्या अतिदृष्टीचा दणका! मदतीला धावले समाजसेवक मंगेश औताडे व एकलव्य आदिवासी परिषदेचे बहुसंख्य युवक

काल कोपरगाव तालुक्यातील वेळापूर हद्दीत पावसाच्या अतिवृष्टीचा मोठा दणका बसला या पावसाची तीव्रता जास्त असल्याकारणाने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते वेळापूर ग्रामपंचायत यांना वारंवार अर्ज भानगडी करून देखील अद्याप आदिवासींना व्यवस्थित घर नाही, पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना केली नाही, यामुळे काल हे पाणी आदिवासींच्या घरात शिरले व आदिवासींचा संसार पाण्यात गेला सर्वत्र हळहळ होत होती ही माहिती मिळतात एकलव्य आदिवासी परिषदेचे युवा तालुका अध्यक्ष कैलास पवार, राजू वाघ, नवनाथ वाघ,बंडू पवार,जगन पिंपळे, सोमनाथ पगारे,नवनाथ पवार,नदीम शेख यांनी मंगेश औताडे यांना आपल्या आदिवासींच्या घरात पाणी शिरले ही माहिती देताच मंगेश औताडे हे वेळापूर गावात उपस्थित राहून तात्काळ हे पाणी गावाच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली, याप्रसंगी मदतीसाठी पिणू वाघ, अनिल वाघ, गणेश वाघ, मंगेश पिंपळे, बालाम माळी,रतन पवार,दिनकर पवार,साईनाथ पवार,भारत पगारे,गोपीनाथ वाघ,सुनील वाघ,निसार शेख,लाहणू वाघ,एकनाथ पगारे,शरद माळी,विशाल पवार,आकाश पवार,किरण वाघ,काशिनाथ वाघ,एकनाथ पवार,शाम पिंपळे,आदींनी परिश्रम घेतले 
तसेच याप्रसंगी एकलव्य आदिवासी परिषद युवा तालुका अध्यक्ष कैलास पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या की माहिती मिळताच मंगेश औताडे हे उपस्थित राहिले व स्वतः पाण्यात उतरून पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करत आहेत, तर मंगेश औताडे म्हणाले की वेळापूर येथील आदिवासींना आजही हक्क अधिकारापासून वंचित ठेवलं बऱ्याचशा आदिवासींना घरकुल नाही पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वेळेवर उपयोजना न केल्यामुळे हे पावसाचे पाणी घरात शिरले व बरेच आदिवासींचा प्रपंच उध्वस्त झाला असून तात्काळ उद्याच नळ्या बसवण्याचे काम ग्रामपंचायत ने करावे अन्यथा येते एक-दोन दिवसात वेळापूर ग्रामपंचायत समोर सर्व आदिवासी बांधवांच्या पुढाकारातून तीव्र स्वरूपाच आंदोलन करू आणि तरीही न्याय मिळेत नसेल तर ग्रामपंचायत तिला देखील टाळे ठोकू असा खोचक इशारा संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments