Advertisement

नागरिकांना सतर्कतेची जाहीर सूचना

एसके जी पंधरे उपसंपादक संचालक T T 47 News 

*तालुक्यात घरकुलच्या नावाखाली लुबाडणूक करणारी टोळी सक्रिय*

           भंडारा(१०/०८) _लाखांदूर तालुक्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे कि, प्राधानमंत्री आवास प्लस योजनेतर्गत तालुक्यातील 62 ग्रामपंचायत मध्ये प्रपत्र "ड" च्या यादीनुसार घरकुलचे बांधकाम मोठ्याप्रमाणात सुरु आहेत. काही भामटे साकोली पंचायत समिती येथील कर्मचारी हटवार असल्याचे नाव सांगून 15 दिवसात घरकुल मंजूर करून देण्याचे खोटे आश्वासन देऊन 12 हजाराची मागणी करीत आहेत, त्यापैकी 4 हजार सुरवातीला मागून पुढील 5 दिवसात घरकुलचा धनादेश घेऊन येणार असल्याची बतावणी करून लुबाडणूक करीत असल्याचा प्रकार चिंचोली/अंतरगाव ग्रामपंचायत हद्दीत घडला आहे. तेव्हा अशा ठकांच्या आहारी न जाता लगेच त्यागावचे सरपंच, उपसरपंच, सचिव किंवा पंचायत समिती येथील घरकुल संबंधित कर्मचारी/अभियंता यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. घरकुलच्या संबंधाने प्रपत्र "ड" च्या यादीच्या प्राधान्य क्रमानुसार ज्या ग्रामपंचायतीना टार्गेट दिला आहे त्या व्यतिरिक्त घरकूल पुढचा टार्गेट मिळत पर्यन्त घरकुल मंजूर होऊ शकत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही भामट्याच्या आहारी किंवा भुलथापाना बळी जाऊ नका. ही तालुक्यात एक टोळी असून घरात एकटा असल्याची संधी साधून लुबाडणूक करतात, तेव्हा सावध राहा, सतर्क राहा, व स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका._

✒️
*प्रमोद प्रधान*
_सरपंच, ग्रामपंचायत चिंचोली/अंतरगाव_

Post a Comment

0 Comments