Advertisement

भाजपा नेत्यानं आदिवासी महिलेस शौच चाटायला लावलं

*गरम तव्याने चटके लावले**राॅडने दात तोडले*
 
*बिरसा फायटर्सने केला घटनेचा निषेध!*

एस के जी पंधरे राज्य प्रतिनिधी रा विश्व पञकार संघ 



रत्नागिरी: सीमा पात्रा नावाच्या महिला नेत्यानं सुनिता नावाच्या एका आदिवासी महीलेला चक्क शौच चाटायला लावलं,लगवी चाटायला लावलं,राॅड ने दांत तोडल्याची धक्कादायक घटना झारखंड राज्यातील रांची येथे घडली.मानवतेला लाजवणा-या या घटनेचा बिरसा फायटर्स संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.सीमा पात्रा ही भाजपा महिला मोर्चाची नेता असून घटनेनंतर तिला भाजपा पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. तिच्या वर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सीमा पात्राचे पती हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत व त्यांचा मुलगा आयुष्यमान यांनीच हा अत्याचारा चा प्रकार आपल्या मित्रांसोबत समोर आणलेला आहे. पोलीसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुनिताला सीमा पात्राच्या अत्याचारापासून बाहेर काढले व सरकारी दवाखान्यात दाखल केले.तेथे अन्यायग्रस्त असाह्मय महिला सुनिताने आपल्यावर गेली 6 वर्षेपासून सीमा पात्रा यांनी कशाप्रकारे अत्याचार केला? हे सांगितले.
            तब्बल 6 वर्षांपासून सुनिताला सीमा पात्राने आपल्या घरात बंदिस्त ठेवले होते.तिच्यावर अत्याचार सुरू होता.आपली आई सीमा पात्रा ही सुनिताला जानवरांसारखी( मानसिक ञास) टाॅर्चर करत आहे,हे लक्षात आल्यावर सुज्ञ मुलगा आयुष्यमान यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.राज्यपाल यांनी पोलिसांना घटनेची माहिती मागितल्यानंतर पोलिसांनी सीमा पात्रा यांना तात्काळ अटक केली आहे.
              देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे.देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी अशा मानवतेला कलंकित करणा-या घटना घडत आहेत, ही फारच लाजीरवाणी गोष्ट आहे.जातीयव्यवस्था अजूनही कशी जिवंत आहे,हे याघटनेतून दिसून येते. आम्ही सुनिताचा विडीओ बघितला,आम्हाला खूप दु:ख झाले.रागही खूप आला.अशा आरोपींना फाशी दिलीच पाहिजे,यांना सुद्धा तशेच गरम तव्याचे चटके दिले गेले पाहिजे.तरच असे आरोपी सुधारतील,आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे,अशी आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत,अशा तीव्र शब्दांत सुशिलकुमार पावरा यांनी निषेध व्यक्त केला आहे.तसेच महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून या घटनेची बिरसा फायटर्सने निषेध नोंदवत मोठा जनांदोलन करण्याची तयारी सुरेशकुमार पंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्सच वतीने मागणी करून जागोजागी निषेध नोंदवू असे गॄपवर व शोसल मिडीया वर म्हटले आहे

Post a Comment

0 Comments