Advertisement

कोपरगांव - 18 सप्टेंबर रोजी एकलव्य संटनेची बैठक-*जिल्हा अध्यक्ष (उत्तर नगर) गोरख नाईक



एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा म्हाडा अध्यक्ष मा. शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या आदेशाहुन व प्रदेश महासचिव किरण ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.18 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11 वाजता बुद्धविहार या ठिकाणी एकलव्य संघटनेची महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 
नवीन तालुका कार्यकारणी व 25 सप्टेंबर रोजी चाळीसगांव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्याचे नियोजन संदर्भात चर्चा होणार आहे.
या बैठकीसाठी कोपरगांव तालुक्यातील सर्व शाखा कार्यकारणी,गट पदाधिकारी,माजी पदाधिकारी,जिल्हा राज्य कार्यकारणी सदस्य व पुढील काळात संघटनेत सक्रिय पदावर काम करण्याची इच्छा असलेले कार्यकर्ते यांनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष गोरख नाईक यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments