Advertisement

बैल दूध देत नाही म्हणून दूधाळ जनावरे योजनेत गाय ऐवजी बैल वाटल्याचा दावा खोटा

*मंत्री विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचार घोटाळ्याचे समर्थकांची गोची*

*बिरसा फायटर्सच्या आंदोलनाला 2 पक्ष व 3 संघटनांचा पाठिंबा*

रत्नागिरी:6 हजार कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांचे आदिवासी विकास मंत्रीपद रद्द करा व अटक करा,या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांनी दापोली येथे उपोषण करून भ्रष्टाचार घोटाळ्याचा निषेध उपोषण केले. आदिवासींचे लूटारू,आदिवासींचा पैसा वापस करा,अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे.भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास मंत्री पद दिल्यास बिरसा फायटर्स राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनाला दिला होता.या मागणीचे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष सह एकूण 30 जिल्ह्यातून बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवली होती.तरीही विजयकुमार गावित यांना भ्रष्टाचार केलेले पूर्वीच्याच खात्याचे आदिवासी विकास मंत्रीपद दिल्यामुळे आदिवासी समाजात संताप निर्माण झाला आहे.
      मंत्री विजयकुमार गावित यांचा नंदूरबार जिल्ह्याचे शिल्पकार असा फोटो भाजपाच्या सदस्यांकडून काही वाटसप ग्रुप वर टाकण्यात आला.त्या फोटोत बैल व काही आक्षेपार्ह चित्र दाखवण्यात आले होते.दूधाळ जनावरे योजनेअंतर्गत करोडो रूपयांचा भ्रष्टाचार केल्याबद्दल चर्चा एका वाॅटसप ग्रुपवर सुरू असताना विजयकुमार गावित यांच्या एका समर्थकाने आम्हाला बैल वाटप केले असल्याची पोस्ट टाकली.त्यावर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.कारण दूधाळ जनावरे योजनेत बैल येत नाहीत ,बैल दूध देत नाहीत, म्हणून लोकांची दिशाभूल करू नका.गाय ऐवजी बैल वाटप केले असल्यास किंवा तुम्हाला जे काही वाटप केले त्याचे पुरावे ग्रुप वर टाका.असे सुशिलकुमार पावरा यांनी विजयकुमार गावित यांच्या समर्थकांना आव्हान केले.ही चर्चा सुरू असतानाच आम्हाला काहीही मिळाले नाही,अशा पोस्ट काही आदिवासी लाभार्थीनी टाकल्या.त्यामुळे मंत्री विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचार घोटाळ्याचे समर्थन करणा-या दलालांची चांगलीच गोची निर्माण झाली आहे.
                 बिरसा फायटर्सच्या मंत्री विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष,प्रहार अशा 2 पक्षांनी तर सातपुडा बचाव आंदोलन, आदिवासी युवा बहुउद्देशीय संस्था पूसद यवतमाळ ,पावरा समाज संघ महाराष्ट्र अशा 3 सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.त्यामुळे मंत्री विजयकुमार गावित यांना अटकेची मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments