Advertisement

जिल्ह्यातील पोलीस पाटीलांची रिक्त पदे त्वरित भरा: बिरसा फायटर्सची मागणी

*जिल्हाधिकारी व तहसीलदार दापोली यांना निवेदन* 

रत्नागिरी:जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची रिक्त पदे त्वरित भरा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी रत्नागिरीचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ.बी.एन. पाटील,दापोली उपविभागीय अधिकारी व दापोलीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे देण्यात आले.
              निवेदनात म्हटले आहे की,,पोलिस पाटील हा महसूल व पोलिस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो.गाव पातळीवरील घटना,घडामोडी,तंटे, वाद गावातच सोडविण्याची कामे केली जातात.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या कामात पोलीस पाटील यांची भूमिका महत्त्वाची असते.परंतु,अद्यापही जिल्ह्यातील अनेक गावात पोलिस पाटील रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत.त्यामुळे गावांतील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.दापोली तालुक्यातील काही महसुली गावात अजूनही पोलिस पाटील यांची रिक्त पदे भरण्यात आलेले नाहीत.तरी,जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसीलदार दापोली यांच्याकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments