Advertisement

सुशीलकुमार पावरा यांना विधानपरिषद सदस्यत्व द्या:बिरसा फायटर्सची मागणी

*शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडे राज्य शाखेने केली शिफारस* 

दापोली: ( प्रतिनिधी) बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष /आदिवासीयुवकांचेआदर्श,संघर्षाचेमहामेरू,समाजसेवक,शिक्षक,गायक,नृत्यक,लेखक,कवी,पत्रकार,कराटेपटू,उपोषणकर्ता,आंदोलनकर्ता,राष्ट्रीय कला मित्र सुशिलकुमार पावरा यांना विधानपरिषद सदस्यत्व द्या,अशी मागणी शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे.बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष मनोज पावरा,राजेश धुर्वे उपाध्यक्ष महाराष्ट्र,राजेंद्र पाडवी महासचिव, संजय दळवी सचिव, दादाजी बागुल महानिरीक्षक यांनी ही शिफारस उद्धव ठाकरेंकडेकेलीआहे.राज्यभरातूनगाव,तालुका,जिल्हा,
विभाग व राज्य शाखा पदाधिकाऱ्यांकडून निवेदन पाठवली जात आहेत. 
                   निवेदनात म्हटले आहे की,बिरसा फायटर्स संघटनेचे राज्यात 300 च्या आसपास शाखा तयार झाल्या आहेत व राज्यभर बिरसा फायटर्स संघटनेचे दमदार कार्य सुरू आहे. कमी कालावधीत राज्यात सर्वाधिक शाखा असणारी बिरसा फायटर्स ही राज्यातील एकमेव आदिवासी सामाजिक संघटना आहे.राज्यातील ज्वलंत विषयावर बिरसा फायटर्स संघटनेचे पदाधिकारी आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधून घेत आहेत. सरकार दरबारी दबाव निर्माण होऊन सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या बिरसा फायटर्स संघटनेच्या माध्यमातून जलद गतीने सुटत आहेत.एकंदरीत राज्यात बिरसा फायटर्स संघटनेचा दबदबा निर्माण झाला आहे.
                     बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेचे नेतृत्व आमचे सुशिलकुमार पावरा हे करत आहेत.सुशिल कुमार पावरा यांना सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल international idol award 2021 ने सन्मानीत करण्यात आले आहे.कला क्षेत्रातही दमदार कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय कला मित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.तसेच मानवसेवेतही कामगिरी केल्याबद्दल मानवविकास कल्याण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.भ्रष्टाचार विरोधी काम केल्याबद्दल अँन्टी करप्शन ब्युरोकडून त्यांना अनेक ठिकाणी सन्मानीत करण्यात आले आहे.सुशिलकुमार पावरा हे एक शिक्षक असून त्यांनी अन्यायाविरोधात लढत तब्बल 340 पेक्षा अधिक वेळा उपोषण केली आहेत.एवढी जास्त उपोषण करणारे सुशिलकुमार पावरा ही आपल्या भारत देशातच नाही तर जगातली पहिली व एकमेव लढवय्या व्यक्ती ठरत आहेत. संघर्षांचे महामेरू म्हणून युवकांसमोर त्यांची ओळख निर्माण झाली आहे.सुशिल कुमार पावरा यांनी अनेक वृत्तपत्रात आदिवासींचे जीवन विषयांवर लिखाण केले आहे.अनेक विडंबनात्मक कविता त्यांनी लिहिल्या आहेत.अनेक न्यूज चॅनेलवर प्रतिनिधित्व करत लोकांच्या समस्यांवर वाचा फोडण्याचे काम करत आहेत. त्याचबरोबर हजारो आदिवासी,मराठी हिंदी,गुजराती गाण्यांचे गायन केले आहे.हजारों आदिवासी मराठी,हिंदी गाण्यांवर नृत्य केले आहेत. टिक टाॅक वरही आपल्या गायकी व नृत्याने प्रेक्षकांवर छाप पाडल्यामुळे सुशिलकुमार पावरा यांना टिक टाॅक स्टार म्हणून लोक ओळखू लागले होते. कराटेक्षेत्रात ऑरेंज बेल्ट प्राप्त करून नेपूण्य मिळवले आहेत.अनेक सामाजिक आंदोलन करून व आंदोलनात शामिल होऊन आदिवासींना न्याय मिळवून दिला आहे. आदिवासींच्या विषयांवर वारंवार आवाज उठवत समाजाचे बुलंद आवाज म्हणून समोर आले आहेत समाजसेवक,शिक्षक,गायक,नृत्यक,लेखक,कवी,पत्रकार, कराटेपटू,उपोषणकर्ता,आंदोलन कर्ता,राष्ट्रीय कला मित्र व राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स म्हणून सुशिलकुमार पावरा यांची समाजात विशेष ओळख निर्माण झाली आहे.कला,क्रीडा,संगीत,नृत्य,शिक्षण,समाजसेवा,पत्रकारिता इत्यादी सगळ्याच श्रेत्रात नैपुण्य प्राप्त करणारी सुशिलकुमार पावरा ही आदिवासी समाजातील एकमेव व्यक्ती ठरत आहेत.वाॅटसप, फेसबुक,सोशल मिडीया व सामाजिक क्षेत्रात सुशिलकुमार पावरा यांना आदिवासी समाजातील लोकांबरोबर सर्वच समाजातील प्रेक्षक सर्वाधिक पसंत करतात. अशा आमच्या युवकांचे प्रेरणास्थान, संघर्षाचे महामेरू ,बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना आपल्या शिवसेना पक्षाच्या विधानपरिषदमधील रिक्त जागांतून विधान परिषद सदस्यत्व म्हणून घ्यावे व बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधीला विधानपरिषदवर प्रतिनिधित्व करण्यास संधी द्यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या कडे केली आहे.
याबाबत फोनवर पदाधिकार्यासोबत सल्ला मसलत करून हा निर्णय पुढे घेत असल्याचे प्रसार माध्यमांना वाट्सप तसेच बोलतांनी सांगितले जर भविष्यात अध्यक्ष जरी पक्षाचे नसले तरी वेळ पडल्यास अन्यायाला वाचा फोडणारा पक्ष शिवसेना व बिरसा फायटर्सची आक्रमक भुमिका कामात येतील व आमचे संघटन समाजाचे कार्य  व संघटण वाढीचे काम निश्चित करेल असे पावरा सोबत फोनवर सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

Post a Comment

0 Comments