Advertisement

बिरसा फायटर्सला भारतीय कम्युनिस्ट पक्ष व सातपुडा बचाव आंदोलनाचा पाठिंबा

*तहसीलदार अक्कलकुवा यांना दिले पाठिंबा निवेदन* 

*6 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणा-या मंत्री विजयकुमार गावित विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार*

*मतदारांना करोडो रूपये वाटून विजयकुमार गावित निवडून आले: भारतीय कम्युनिस्ट पक्ष* 

अक्लकुवा :6 हजार कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांचे आदिवासी विकास मंत्रीपद रद्द करा व अटक करा,या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांनी दापोली येथे उपोषण करून भ्रष्टाचार घोटाळ्याचा निषेध उपोषण केले. आदिवासींचे लूटारू,आदिवासींचा पैसा वापस करा,अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे.भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास मंत्री पद दिल्यास बिरसा फायटर्स राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनाला दिला होता.या मागणीचे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष सह एकूण 30 जिल्ह्यातून बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवली होती.तरीही विजयकुमार गावित यांना भ्रष्टाचार केलेले पूर्वीच्याच खात्याचे आदिवासी विकास मंत्रीपद दिल्यामुळे आदिवासी समाजात संताप निर्माण झाला आहे.
       बिरसा फायटर्सच्या या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.या पाठिंब्याचे निवेदन काॅ.डाॅ.सतीश के.पाडवी धडगांव तालुका सेक्रेटरी तथा जिल्हा नंदुरबार कमिटी सदस्य यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी तहसीलदार अक्कलकुवा यांना दिले आहे.आदिवासी विकास विभाग खात्यात मंत्री विजयकुमार गावित यांनी 6 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याविरोधात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी उपोषण व संघर्षांला जाहीर पाठिंबा देत असल्याचे या निवेदनात लिहले आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपल्या सहयोगी सातपुडा बचाव आंदोलन सह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
         आदिवासी विकास विभागात करोडोंचा भ्रष्टाचार करून नंदूरबार जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत करोडो रूपये मतदारांना देऊन पैशांचा गैरवापर करत आले असून घोटाळेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर्फे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments