Advertisement

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या

-----------------------
_जनहित युवा मोर्चाने केली मागणी_

नागपूर: भारतिय साहित्यकलेचे जगविख्यात साहित्यसम्राट सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची महाराष्ट्र शासनाने नेहमीच उपेक्षा केली असुन दिड दिवस शिकलेल्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या क्रांतिकारी व विद्रोही साहित्यलेखन, पोवाडे, गीतांद्वारे जनजागृती करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गतीमान केली. अण्णाभाऊंनी मराठी साहित्य रशियापर्यंत पोहोचवून महाराष्ट्राचा सन्मान वाढविला तरीही अण्णाभाऊंना महाराष्ट्र शासनाने अद्याप महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले नाही त्यांची घोर उपेक्षा केली. परंतू आता अण्णाभाऊंची उपेक्षा युवापिढी सहन करणार नाही म्हणून राज्य शासनाने अण्णाभाऊ साठे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार त्वरित द्यावा आणि केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे त्यासाठी राज्य सरकारकडे त्वरित प्रस्ताव पाठवून प्रभावीपणे पाठपुरावा करावा अशी मागणी जनहित युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे यांनी केली.
जनहित युवा मोर्चाच्या वतीने दिक्षाभूमी परिसर स्थित पुतळ्याला युवा उद्योजक सचिन शेंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जनहित युवा मोर्चाचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे, महासचिव एड.सचिन मेकाले, उपाध्यक्ष ऋषी अव्हाडकर, युवानेते पद्माकर बावणे, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतिक ढोक, विद्रोही युवा कवि गौरव शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक भिमराव ताकतोडे, जनार्दन ताकतोडे, ज्येष्ठनेते अनिल रामटेके, कमलेश हांडे, आशिफ अंसारी, पितांबर गेंदले, निखिल डूंभरे, प्रकाश जगताप, लक्ष्मीकांत गजभिये, अरविंद धुर्वे, मनोज मडावी इत्यादी मान्यवर व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments