Advertisement

3 वर्षाच्या क्रीश राठोडने फोडली हंडी


*गोल्ड व्हॅली दापोलीत दही हंडी उत्सव उत्साहात* 

दापोली: 'गोविंदा आला रे,आला रे,मच गया शोर सारी नगरी रे..' अशी आरोळी देत गोल्ड व्हॅली दापोलीतील बालकलाकारांनी लक्षवेधक बालकांचा मनोरा रचून दही हंडी उत्सव साजरा केला.क्रीश राठोड या 3 वर्षाच्या बालकाच्या हस्ते ही दही हंडी फोडण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सुरू झालेला हा उत्सव सहा वाजेपर्यंत दोन तास सुरू होता.गोल्ड व्हॅलीत पहिल्यांदाच अशी छोटी दही हंडी फोडून उत्सव साजरा करण्यात आला.दही हंडी फोडून मुलांनी हंडीतील दहीदूधाची,चाॅकलेट व फळांची लयलूट केली.
                 ' चांदी की डाल पर सोने का मोर ' या गाण्यावर परी पावरा हिने सुंदर नृत्य करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मराठी व हिंदी गाण्यांवर बालकलाकारांनी नाचत आनंद व्यक्त केला.या उत्सवात समोसा,कचोरी,लाडू,चाॅकलेट व फळे अशा स्वरूपाच्या नाश्ताचाही आस्वाद घेण्यात आला.
             या उत्सवात राजेश झगडे,सुशिलकुमार पावरा,बापू भिसे ,विक्रम ठाकूर,पिंगला पावरा, पूजा राठोड,प्रितम भिसे, सिमा साळवी,प्रियंका भिसे,क्षितिजा कांबळे इत्यादी गोल्ड व्हॅलीतील बांधव व मायरा दळवी, विरसिंग राठोड, क्रीश राठोड, परी पावरा,हॅरी पावरा,निर्जला साळवी ,शिवराज ठाकूर ,युवराज ठाकूर इत्यादी बालके उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments