Advertisement

मंत्री विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात आरोपींवर 2 फौजदारी गुन्हे दाखल

*पोलिसांची आरोपींना सक्त ताकीद, आरोपीस दापोलीला बोलावले*

*आरोपी भाजपाचा तळोदा पंचायत समिती सदस्य* 

दापोली:मंत्री विजयकुमार गावित यांच्या 6 हजार कोटी भ्रष्टाचार प्रकरणात लाच देऊ करणा-या आरोपींवर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करण्याची तक्रार तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांनी दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी पोलीस उप अधिक्षक ,लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे दाखल केली.आरोपी व्यक्तीत दाज्या पावरा,पत्ता मु.रेवानगर तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार, पंचायत समिती सदस्य तळोदा मो.9923091422 व केदार पाडवी ,पत्ता-जिल्हा नंदुरबार मो.9922552158 या दोघांचा समावेश आहे. त्यापैकी दाज्या पावरा या आरोपी व्यक्तीने सुशिलकुमार पावरा यांना अर्वाच्य व अश्लील भाषेत ' काहीही करू शकत नाही तू माझ, वडील व बायकोला उद्देशून शिवीगाळ करत या 6 कोटी भ्रष्टाचार प्रकरणात तुलाच त्रास होईल, तुलाच आम्ही त्रास देऊ ,अशी धमकी दिली.म्हणून तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांनी आरोपी दाज्या पावरा याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.आरोपी विरोधात भारतीय दंडसंहिता कलम 504 व 506 अन्वये दापोली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल /970/ सुकाळे करीत आहेत. पोलीस कार्यवाहीत आरोपी दाज्या पावरा यांना याबाबत फोनवर पोलिसांद्वारे सक्त ताकीद व समज देण्यात आली आहे.चौकशीसाठी पोलीस ठाणे दापोली जिल्हा रत्नागिरी येथे बोलावले आहे.
               6 हजार कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास मंत्रीपदावरून हटवा व तात्काळ अटक करा,या मागणीचे निवेदन मी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.त्याचबरोबर मंत्री विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास मंत्रीपद रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचे निवेदन 30 जिल्ह्यातील आमच्या बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी पाठवले आहे.आदिवासींचे लुटारू,आदिवासींचे पैसे परत करा या मागणीसाठी मी उपोषण सुद्धा केले आहे.6 हजार कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात दोषी ठरलेल्या विजयकुमार गावित यांना आदिवासी विकास मंत्रीपदावरून हटवा व तात्काळ अटक करा,या मागणीचा माझा विडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला.त्यावर दाज्या पावरा मु.रेवानगर तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार, पंचायत समिती सदस्य तळोदा यांनी दिनांक 16 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6.54 वाजता स्वतःच्या 9923091422 या मोबाईल क्रमांकावरून 'पाॅकेट हवा का जो इतरांकडून येतो तसा' अशा शब्दांत भगवान बिरसा मुंडा वाॅटसप ग्रुपवर लाच देऊ केली आहे.त्यालाच अनुसरून सहआरोपी केदार पाडवी यांनी स्वतःच्या 9922552158 या मोबाईल क्रमांकावरून खाते नंबर द्या पैसे पाठवायला लावतो,अशा शब्दांत लाच देण्याच्या कामात सहभाग दाखवला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक प्रकरणात सरकारी साक्षीदार म्हणून तक्रारीद्वारे 3 अधिका-यांना रंगेहात लाच घेतांना पकडून दिल्याबद्दल मला अँन्टी करप्शन ब्युरो नंदुरबार व नाशिक कडून सन्मानीत करण्यात आले आहे.मी भ्रष्टाचार विरोधी कामे करतो.मंत्री विजयकुमार गावित भ्रष्टाचार प्रकरणात पाॅकेट म्हणजेच लाच देऊन प्रकरण मिटवण्यासाठी दाज्या पावरा सह काही विजयकुमार गावित यांचे दलाल माझ्यावर दबाव आणत आहेत.सदर देऊ केलेला पाॅकेट व खाते नंबर वरील रूपये मला लाच म्हणून नको आहे.म्हणून लाच देऊ करणा-या दाज्या पावरा व केदार पाडवी यांच्याविरोधात मी पुराव्याआधारे रीतसर तक्रार दाखल करीत आहे.तरी सदर व्यक्तींवर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.ही विनंती.
               6 हजार कोटी भ्रष्टाचार घोटाळ्यात मंत्री विजयकुमार गावित सह 80 अधिकारी व कंत्राटदार दोषी ठरले आहेत.मा.न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड चौकशी समितीने संबंधित दोषींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठपका ठेवला आहे.हे प्रकरण दाबण्यासाठी समोर आलेले दाज्या पावरा व केदार पाडवी हे मंत्री विजयकुमार गावित यांचे दलाल दिसून येतात. त्यामुळे या भ्रष्टाचार घोटाळ्यात दाज्या पावरा व केदार पाडवी यांचा काय संबंध आहे ? भ्रष्टाचार घोटाळ्यात संबंध असल्यास दाज्या पावरा रेवानगर तालुका तळोदा जिल्हा नंदूरबार व केदार पाडवी नंदुरबार यांच्या संपत्तीची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी.अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी पोलीस उप अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.त्यामुळे मंत्री विजयकुमार गावित यांच्या दलालांचे दाबे दणाणले आहेत.
          दाज्या पावरा या एका आरोपीवर लाच देऊ करणे व तक्रारदारास शिवीगाळ करणे व धमकावणे अशा गुन्ह्यात लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय रत्नागिरी व पोलीस ठाणे दापोली अशा 2 ठिकाणी वेगवेगळे 2 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपीला अटक करून कडक कारवाई करा,अशी मागणी सुशिलकुमार पावरा तक्रारदार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments