Advertisement

मंत्री जातात खड्ड्यात! धडगांव चूलवड वाया अक्कलकुवा जाणारा रस्ता दुरुस्त करा,बिरसा फायटर्सची मागणी



धडगांव प्रतिनिधी: धडगांव हून चूलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब,नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी,व उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा ,मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांच्याकडे केली आहे.या रस्त्याची सध्या वाईट अवस्था झाली आहे.रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा सवाल उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे हा रस्ता विद्यमान आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री के.सी.पाडवी यांच्या मतदारसंघातील रस्ता असून मंत्री के.सी.पाडवी यांच्या असली गावाकडे जाणारा हा रस्ता आहे.धडगाव ते दाब पर्यंत हा रस्ता खूपच खराब झाला आहे.धडगाव हून चुलवड कालीबेल दाब अक्कलकुवा या गावी जाण्यासाठी प्रवासी जरली मार्गाचा वापर करतात,परंतू जरली येथील पूलावरील लोखंड वर उखडून आले आहे,पूल कधीही कोसळून नदीत वाहून जाईल,अशी स्थिती निर्माण झाली आहे,म्हणून लोक जरली मार्गाचा वापर न करता धडगांव हून राडीकलम मार्गे चूलवड कालीबेल दाब व अक्कलकुवा येथे जात आहेत. 
                      रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे,तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे.खड्डे चूकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाडयांचेही प्रचंड नुकसान होत आहे.
मंत्री महोदय या खड्ड्यातून आपल्या गावाकडे जातात की काय ? की आपल्या गावातच येत नाहीत की काय? असा प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत. हा रस्ता लवकरात लवकर दुरूस्त करावा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे.रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास व रस्ता दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करत येथील लोकप्रतिनिधी आदिवासी विकास मंत्री व प्रशासनासुद्धा जाहीर निषेध करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने दिला आहे.

Post a Comment

0 Comments