Advertisement

मुरंबी ग्रामपंचायत पैकी उंबरणापाडा येथिल रस्ताचे काम तर चालु आहे पण अतिशय खराब प्रकारे काम सुरू आहे तर गावातील लोक व सामाजिक कार्यकर्ता पिंटू रंधे यांनी काम बंद केले

दि. ११/०५/२०२२ ग्राम पंचायत मुरंबी पैकी उंबरणापाडा येथिल काम हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत असून ते काम चालू आहे. ते काम अतिशय खराब आहे. जे काम आता पर्यंत केले आहे. ते काम खडीचे मोजमाप किती होते. त्याचे मोज माप त्या रस्त्याच्या कामाची लांबी, रुंदी व उंची किती होती. त्या नुसार ते काम झालेलेच नाही. त्यात ठेकेदार समीर साबळे तसेच त्या कामाचे अझुण कोण ढेकेदार आहेत. तसेच काम पाहणीचे अधिकार इंजिनिअर ला आहेत, तसेच अधिकारी लोकांना काम पाहणीचे अधिकार असतांना सुद्धा त्या ठिकाणी काम बघावयास कोणी आलेले नाही.
 रस्त्याची मंजुरी एकूण. १७२.२० लक्ष एवढी मंजुरी असून त्या रस्त्यावर पहिला रस्ता होता. त्या रस्त्यावर कुडी एकदम खडी पातळ थर टाकून डांबर सुद्धा पातळ मारले आणि त्यावर रॉलर सुद्धा मारलेला नाही. असे काम केले आहे. रस्त्याचे शक्याचे काम केले आहे, ते सुद्धा असेच केले की रेती नाल्याची घेतली होती आणि त्या धका भराईचे कामात मोठा मोठा ले दगड टाकून भराई केले आहे. त्यात कच खडी वापरलेली नाही. तसेच मोऱ्यांचे काम सुद्धा पाईप मातीमध्ये पुरून दिलेले आणि दोनी साईटला काँक्रीटी करन घेतले आहे. असे काम निष्काळजी पणाने चालू आहे. गावातील लोकांना सगळं समजत खराब काम कसे व चांगले कसे त्यात सुशिक्षित लोक शिक्षण झालेले माणसांनी त्या ठिकाणी काही कामांचे काही विचारले की हे काम करायला काम कोणी घेतले आहे. त्या कामावर देख भाल करण्यासाठी कोण आहे. ते विचारतात तर त्या ठिकाणी कोणीही नाही. अधिकारी लोकांना फोन करतोय तर उडवाउडवीची उतरे देत आहेत. 

या रस्त्यावर आज पर्यंत इंजिनिअर काम बघण्यासाठी व अधिकारी लोक कोणीही लेलेले नाही. तर काम कसे चालू आहे. या कामाची निष्काळजी पणा चालू आहे. वेवस्तीत काम करत नसल्यामुळे आम्ही गावकरी व सामाजिक कार्यकरते पिन्टू कान्हू रन्धे हे त्या ठिकाणी जाऊन काम खराब करत असल्याचे गाव काऱ्यांनी काम बंद केले आहे. जो पर्यंत अधिकारी लोक व इंजिनिअर लोक काम बघावयास येणार नाही तो पर्यंत काम बंद केले जाईल अशी मागणी गावातील लोक व सामाजिक कार्यकर्ते पिन्टू कान्हू रन्धे यांनी काम बंद केले आहे. त्या ठिकाणी नियमानुसार ते काम करत नाही म्हणून सर्व अधिकार लोक त्या कामावर काम पाहणी ठिकाणी अधिकारी लोक आल्या शिवाय ते काम पूर्ण करण्यासाठी त्या रस्त्याचे बिल निघणार नाही. तसेच त्या काम सुरू केले जाणार नाही. अशी माहिती गावातील लोकांनी दिली व सामाजिक कार्यकर्ते पिन्टू कान्हू रन्धे यांनी सांगितले की काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे असून ते काम जो पर्यंत अधिकारी व इंजिनिअर पाहणी करण्यासाठी येणार नाही. तो पर्यंत काम बंद राहील अशी माहिती साहेबांनी सांगितले आहे. तसेच गावातील लोक ठाम भूमिका घेतली आहे.

Post a Comment

0 Comments