Advertisement

डॉ रणजित पावरा यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा.आ.डॉ.राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला

मुंबई-12 एप्रिल - नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. रणजित पावरा यांना सह्याद्री उद्योग समूह, मुंबई व न्युज लाईन मिडिया, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटर नरीमन पाँईट मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री मा.आ.डॉ. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      भारतासह संपूर्ण जगच कोरोना महामारीच्या भीषण संकटात सापडले असतांना कोरोना विषाणूच्या लढाईत डॉक्टर सर्वात पुढे होते. रुग्णांना महामारीतून वाचवण्यासाठी स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र संघर्ष करून अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ .पावरा यांचे विशेष महत्त्वपूर्ण योगदान राहिले होते.
 याची दखल घेऊन त्यांना काल मुंबई येथे राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी मा.आ.विनायकरावजी मेटे साहेब विधानपरिषद सदस्य तथा संस्थापक शिवसंग्राम पक्ष,मा.आ.निलेशजी लंकेसाहेब विधानसभा सदस्य, मा.आ.संजयजी बनसोडे पाणीपुरवठा राज्यमंत्री,मा.आ.संदिपजी थोरात, मा.नवनाथ घुगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. डॉ. पावरा यांच्या कार्यकर्तुत्वाची दखल घेऊन राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

"अंगावर पीपीई कीट चढविली की,अंगाला दरदरून घाम फुटतो, पाणी पिता येत नाही. काही परिचारिका व डॉक्टर एवढेच विश्व बनते. दिवसभर विषाणूच्या विळख्यात असल्याने बाहेर पडल्यावर आपल्यामुळे कुटुंबातील व्यक्ती, मित्रांना, संसर्ग होणार तर नाही ना ? अशी भावना घर करून होती. स्वतः ची लहान मुले, पत्नी, घरातील वयस्कर व्यक्ती यांच्या पासून अलिप्तता ठेवणे अपरिहार्य होते. काळ खूप कठीण होता. रूग्णसेवेसाठी हा एक त्यागच म्हणावे लागेल. हा पुरस्कार मिळाल्याने सामाजिक जबाबदारी वाढली आहे."
   डॉ. रणजित पावरा
         बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय,नंदुरबार.

Post a Comment

1 Comments

Unknown said…
अभिनंदन डॉ रणजित पावरा दादा