Advertisement

बिरसा फायटर्सची पुन्हा मंत्रालयात धडक बेघर आदिवासींच्या न्यायासाठी धडपड

मुंबई: अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील पुणतांबा- रस्तापूर येथील बेघर झालेल्या 122 आदिवासी कुटुंबांना जमिन तातडीने मिळावी ,या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेच्या टिमने थेट पुन्हा  मंत्रालय  गाठले. 15 दिवसापूर्वी बिरसा फायटर्स टिमने बेघर आदिवासी कुटुंबांना जमिन मिळावी या मागणीसाठी मंत्रालयात धडक मारली होती. मंत्रालय मुंबई येथे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व कक्ष अधिकारी महसूल विभाग व वनविभाग मंत्रालय मुंबई यांना निवेदन देण्यात आली. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, पुणतांबा गाव शाखेचे अध्यक्ष भिमा साळुंके, उपाध्यक्ष मच्छिंद्र  रजपूत, रमेश सोनवणे, दिपक माळी,पवन पावरा  सह काही आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते. आता पुन्हा सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या नेतृत्वाखाली बेघर आदिवासींच्या न्यायासाठी बिरसा फायटर्सची मंत्रालयात धडपड दिसून आली.दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी बिरसा फायटर्स टिमने काही मंत्र्यांची भेट घेतली.
                जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कक्ष अधिकारी महसूल विभाग व वनविभाग मंत्रालय मुंबई यांना दिनांक 09/03/2022 रोजी पुणतांबा येथील बेघर झालेल्या 122 आदिवासी कुटुंबांना जमिन मिळावी यासाठी कार्यवाहीसाठी तातडीने पत्र दिले होते. त्या पत्राची अंमलबजावणी करण्यात यावी, म्हणून बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी मंत्रालयात दिनांक 21 मार्च 2022 रोजी धडक मारली होती व मागणीचा पाठपुरावा केला होता. 
            122 बेघर आदिवासी कुटुंबांना तातडीने  जमिन मिळावी, यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य ती उचित कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने मंत्रालयात पुन्हा  केली आहे.यावेळी बेघर आदिवासींना न्याय न मिळाल्याच राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. हे बघून  मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदनाची दखल गांभीर्याने  घेतली आहे.

Post a Comment

0 Comments