Advertisement

शिरपूर सुवर्ण नगरीचे शिल्पकार भूपेशभाई पटेल साहेब यांच्या हस्ते नगरसेवक गणेश भाऊ सावडे यांना पुरस्कार देण्यात आले

सोमवार 4/4/2022 रोजी एस एम पटेल हॉल शिरपूर येथे शिरपूर - वरवाडे नगरपालिकेच्या स्वच्छ संरक्षण 2022 अंतर्गत शिरपूर नगरपालिका वार्ड नं 12 मध्ये घरगुती ओला-सुका कचरा 100% विलगीकरण जनजागृती व कृती संदर्भात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट आत्मनिर्भर वार्ड पुरस्कार श्री गणेश भाऊ सावडे (नगरसेवक) यांना शिरपूर सुवर्ण नगरीचे शिल्पकार भूपेशभाईपटेलसाहेब यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला 
त्यावेळेस उपस्थित शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयश्रीबेन अमरीशभाई पटेल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषारजी नेरकर, नगरसेवक रावसाहेब प्रभाकर रावजी चव्हाण शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे सर्व नगरसेवक कर्मचारी अधिकारी आणि माझी वसुंधरा अभियान यांची टीम मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments