Advertisement

राजकीय पक्षांची ऑफर नाकारत समाजासमोर ठेवला नवा आदर्श

रत्नागिरी:राजकारणापेक्षा समाजकार्याला प्रथम प्राधान्य देत समाजसेवक तथा शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा प्रमुख पदासाठीची आलेली ऑफर चक्क नाकारली आहे.सुशिलकुमार पावरा यांच्या समाजकार्याला प्रभावीत होऊन व बिरसा फायटर्सचे वाढते संघटन बघून त्यांना अनेक राजकीय पक्षांकडून पदांची ऑफर दिली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नंदुरबार जिल्हा आदिवासी सेल प्रमुख पदाची ऑफर फोनद्वारे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून मला देण्यात आली.परंतु मी एक शासकीय कर्मचारी आहे,माझ्यासाठी नोकरी सुद्धा खूप महत्वाची आहे,एकदा राजकारणात शिरलो तर नोकरीला कायमचाच राजीनामा द्यावा लागेल, मला राजकारणात जायचे नाही असे कारण देत सुशिलकुमार पावरा यांनी पक्षाची ही ऑफर नाकारली आहे.
                   सुशिलकुमार पावरा यांची 260 वेळा उपोषण करणारे उपोषणकर्ता,शिक्षक,समाजसेवक, गायक,नृत्यक,कराटेपटू, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स म्हणून विशेष ओळख आहे. सुशिलकुमार पावरा यांना समाजसेवा क्षेत्रातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इंटरनॅशनल ऑयडल अवार्ड 2021, कला क्षेत्रातून राष्ट्रीय कला मित्र पुरस्कार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून महाराष्ट्र भूषण, आदिवासी रत्न इत्यादी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. पावरा समाजसेवा कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.त्यांना आदिवासीं समाजातील युवक आदर्श मानतात. आदिवासी समाजाच्या वाॅटसप ग्रुपवर, फेसबूक पेजवर सुशिलकुमार पावरा यांना प्रेषक सर्वाधिक पसंत करतात.सुशिलकुमार पावरा यांनी टिक टाॅक वरही आपल्या गायकी नृत्याने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली होती. टिक टाॅक स्टार म्हणूनही त्यांना लोक ओळखू लागले होते.कला,क्रीडा,संगीत, गायन,वादन,नृत्य, शिक्षण,समाजसेवा इत्यादीं विविध श्रेत्रात सुशिलकुमार पावरा यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडत आहे.पावरा यांच्या ह्या कार्याला प्रभावीत होऊनच राजकीय पक्षांकडून पदासाठी ऑफर देण्यात येऊ लागली आहे.
             मला माझ्या संघटनेला कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधायचे नाही,माझ्या संघटनेत अनेक राजकीय पक्षाचे व्यक्ती आहेत, त्यांना आम्ही फक्त सामाजिक कार्याच्या अटीवर सभासद व पदाधिकारी बनवत आहोत. राजकीय पक्षात गेल्यावर समाजकार्य करण्यात अनेक बंधने व अडचणी येत असतात.बोगस आदिवासींवर कारवाई,आरक्षण बचाव अशा महत्वाच्या सामाजिक विषयांवर काम करताना राजकीय पक्षांकडून दबाव व बंधने आणली जातात.इतरही अनेक अडचणी येतात म्हणून आदिवासी समाजाच्या सामाजिक हितासाठी मला राजकीय पक्षाची पदे नको,म्हणत सुशिलकुमार पावरा यांनी पक्षाची ऑफर नाकारली आहे.त्यामुळे आदिवासी तरूणांनी सुद्धा राजकीय पक्षापेक्षा सामाजिक कार्याला व सामाजिक संघटनांना अधिक महत्त्व द्यावे,याचा आदर्श पावरा यांच्याकडून घेतला पाहिजेत, अशा प्रतिक्रिया आदिवासी समाजातून येऊ लागल्या आहेत.

Post a Comment

1 Comments