Advertisement

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय समिती सदस्य पदी प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब आडसुळ यांची एकमताने निवड करण्यात आली



 राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या अध्यक्षतेखाली एक कोअर कमिटी नेमून यामध्ये राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांची संघाबद्दल असणारी निष्ठा,कार्य, आणि राज्यभर असणारा शिक्षकांचा संपर्क या सर्व बाबींचा विचार करून त्यांची राष्ट्रीय विश्वगामी मंत्रालय समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली प्रसंगी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

                    या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री जयंत पाटील व पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते मंत्रालय मुंबई येथे सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, राष्ट्रीय महासचिव रमेश देसाई व महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बापूसाहेब आडसुळ यांची मंत्रालय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्या बरोबर पूर्ण राज्यामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. 

             बापूसाहेब आडसूळ यांनी गेली वीस वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांच्या या कार्याची व एकनिष्ठेची पोच या माध्यमातून मिळाल्याची चर्चा सर्वत्र होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल पुणे विभागाचे मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, मोहोळ तालुक्याचे मा.आमदार राजनजी पाटील, सोलापूर जिल्ह्याचे नेते माढा करमाळाचे आमदार संजय मामा शिंदे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार, जिल्हा परिषद सदस्य  आप्पासाहेब उबाळे, यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments