Advertisement

शिक्षक सुशीलकुमार पावरा यांचा उपोषणाचा लढा सुरूच दापोलीच्या बीडीओने सीईओंना केला लेखी पाठपुरावा

दापोली :दोषी व बोगस अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपला उपोषणाचा लढा सुरूच ठेवला आहे.दापोलीचे गटविकास अधिकारी आर.एम.दिघे यांनी सुशीलकुमार पावरा यांच्या उपोषणाच्या मागण्यांबाबत इंदूराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला आहे.
                    जिल्हा परिषद रत्नागिरी,जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, विभागीय आयुक्त कोकण भवन,राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ,आझाद मैदान मुंबई, मंत्रालय मुंबई अशा विविध ठिकाणी मला नाईलाजाने उपोषण करावे लागले.त्यामुळे अजस्त्र सरकारी यंत्रणेला मी जवळून पाहिले आहे. सरकारी यंत्रणा ही एकमेकांशी मिळालेली असते,याचा सुद्धा प्रत्यय आला.न्यायालयीन मार्ग खर्चिक व विलंबाचा असतो. म्हणून सामान्य माणसाला उपोषणामुळे प्रशासनाला कुठेतरी जाग येऊन लवकर न्याय मिळेल ही अपेक्षा असते. किंबहुना उपोषण करणे हाच सामान्य माणसाला एकमेव मार्ग उरतो.सत्याचा शेवटी विजय होतो या आशेवर नाईलाजाने उपोषण करावे लागते, अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे. 
             जोपर्यंत मला न्याय मिळत नाही व दोषी, बोगस, भ्रष्टाचारी अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, असा निर्धार करत जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 261 वे उपोषण दापोलीत सुरूच ठेवले आहे. उपोषणाचे निवेदन दापोलीचे तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले आहे.दोषी व बोगस शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल कचरू शिंदे व विजय दाजी बाईत ह्या दोन्ही शिक्षण विस्तार अधिका-यांना व 31 दोषारोपीत एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सेवेतून बडतर्फ करा,माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,अशा एकूण 28 मागण्यांसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दापोली येथे उपोषण सुरूच ठेवले आहे.

Post a Comment

0 Comments