Advertisement

गडचिरोली: जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने महागाई मुक्त भारत धरणे आंदोलन



 केंद्राचे अपयश चव्हाट्यावर आणण्यासाठी संघर्षाची भूमिका घ्या---- महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आव्हान


गडचिरोली:// केंद्राचे मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. देशाचे जीडीपी दर कमालीचे घसरले असून, बेरोजगारी मुळे युवकांत नैराश्य आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व अन्य जीवनश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत चालले आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकार स्वतःचिच पाठ थोपट आहे. हे केंद्र सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणत त्या विरोधात संघर्षाची भूमिका घेऊन प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरा, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.



 शुक्रवारी पेट्रोल, डिझेल, गॅस, घरगुती खाद्यतेल याच्या दरवाढी विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी महराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा माजी आम.डॉ.नामदेव उसेंडी, आदिवासी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माजी आम. आनंदराव गेडाम, महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, प्रदेश सरचिटणीस डॉ.चंदाताई कोडवते, शरहराध्य सतिश विधाते, महीला काँग्रेस अध्यक्ष रुपालिताई पंदीलवार, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, अतुल मल्लेलवार, नंदू वाईलकर, माजी जि.प.उपाध्यक्ष जीवन पा.नाट, संजय पंदिलवार, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी विभाग अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, शामराव चापले, जयंत हरडे, शोएब मस्तान, नंदू नरोटे, महेश जेलेवार,  मोहन पुराम, प्रभाकर तुलावी, प्रभाकर कुबडे, श्रीकांत काथोडे, वसंत राऊत, सुदर्शन उंदिरवाडे, रामभाऊ नन्नावरे,संदीप भैसारे, मनोज आखाडे, मोरेश्वर सूर्यवंशी, देविदास देशमुख, पंढरी चौके, गणेश धरने, मनोज धारने, प्रशांत कोराम, परशुराम गेडाम, मुकुंद बावणे, दिलीप चुदरी, नीलकंठ बावणे, ढिवरू दुर्गे, अनुरथ, श्रीरंग कोराम,भुपेश कोलते,मनोहर नवघडे, अरविंद फटाले, दिलीप जांभूळकर, देवा देशमुख,मोना पोटे, ढिवरू मेश्राम, दिवाकर निसार,कृष्णा झंजाळ, गिरीधर तितराम,सूरज मडावी, यामिनी ताई कोसरे,  लताताई मुरकुटे, पुष्पा कुमरे, गौरव येणप्रेड्डीवार, विपूल येलेट्टीवार, कुणाल ताजने, सह अनेक मान्यवर व काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

2 Comments

गुढीपाडवा व मराठी नववर्षारंभाची सुरवात उत्तम जावो...