Advertisement

भंडारा जिल्हा येथिल डॉ कडस्कर यांनी नारायण उईक यांना मारहाण केल्याप्रकरणीत दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी गोंडवाना विदर्भचे बिरसा फायटर्स युवा उपाध्यक्ष प्रशांत पंधरे यांनी नागपूर विभाग आरोग्य संचालक,व पोलिस महानिरीक्षक यांना कार्यवाहीसाठी पत्र दिले


एसकेजी पंधरे उपसंपादक Tribal Tiger47 News सहसंघटक महाराष्ट्र,राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ          ( भारत सरकार मान्यता प्राप्त )


नागपूर प्रतिनिधी(३ एप्रिल), तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. २२ मार्च २०२२ रोजी कर्तव्यावर असलेला परिचर श्री.नारायण उईके (वय ५४) या आरोग्य कर्मचाऱ्याला तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कडसकर यांनी परिचराला जवळ बोलावून "तू ड्युटी बरोबर करीत नाही" असे सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हातातील काठीने व लाथा-बुक्क्यांनी वेदम मारहान करुन, गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडतीस आली.


सदर मारहानप्रकरणी परिचर श्री नारायण उईके यांच्या तक्रारीवरुन आरोपी डॉ. सागर कडस्कर यांच्यावर 
ऑट्रसिटी नुसार गोबरवाही पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. एका प्रतिष्ठीत एम.बी.बी.एस. वैद्यकीय शिक्षण
घेतलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्याच आरोग्य केंद्रातील परिचराला मारहान करणे अशोभनीय कृत्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

करीता दोषी वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कडसकर यांचेवर कडक कार्यवाही करण्याची मागणी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी व आदिवासी विविध संघटनेकडून होत आहे.
मा. महोदय, सदर प्रकरणाचा गांभिर्य लक्षात घेता, माणुसकीला काळीमा फासत, एका सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्याया विरुध्द वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर कडसकर यांचेवर दंडात्मक व कडक कायदेशीर कार्यवाही होऊन, गोंड समुदायातील परिचर श्री.नारायण उईके यांना न्याय मिळणेबाबत बिरसा फायटर्सं व जय गोंडवाणा बहु संस्घथा नागपूर तर्फ कडकडीची मागणी करण्यात येत आहे.उपस्थित सबंधीत विभागांना निवेदन स्वंयत ्फे 
युवा उपाध्यक्ष, बिरसा फायटर्स.संघटना विदर्भ प्रदेश यांनी दिले ..वॄतसंकलन नागपूर ग्रामीन :-प्रशांत पंधरे नागपूर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट्स संघ (भारत). अध्यक्ष, जय गोंडवाना बहु व क्रिडा मंडळ, नागपूर (महा. राज्य)

Post a Comment

0 Comments