Advertisement

दापोली येथे गोल्ड व्हॅली बालमंडळाने आयोजित केलेली रंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला



 दापोली: गोल्ड व्हॅली दापोलीत बालमंडळाने आयोजित केलेली रंगपंचमी उत्साहात साजरा करण्यात आली. रंगपंचमीत बालके,मुले,मुली आणि महिलांसोबत पुरूषांनीसुद्धा सहभाग नोंदवला.कार्यक्रमात महिलांची संख्या अधिक होती.होली है भै होली है ,बूरा मत मानो होली है  म्हणत  एकमेकांना ओला व सुका रंग लावत व पिचकारीने रंग उडवत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.दरवर्षी व्हॅलीत हा सण साजरा केला जातो. 



           रंगोत्सवात परी पावरा, हॅरी पावरा,क्रिश राठोड,  विरसिंग राठोड,सोहम घाडीगावकर,  प्रणाली जळणे, सायमी मोरे, क्षितिजा कांबळे,मायरा दळवी    आदि बालकांनी सहभाग नोंदवला तर पिंगला पावरा, अल्का जळणे, कविता घाडीगावकर, सारा मोरे,पुजा राठोड,अर्चना दळवी,पूजा कांबळे इत्यादीं महिला  सहभागी झाल्या. सामूहिक नाच सुद्धा सादर करण्यात आला. शेवटी सामूहिक फोटो सुद्धा काढण्यात आले. बालकांमध्ये खूप आनंद व उत्साह दिसून आला.यावेळी  एकमेकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.



Post a Comment

0 Comments