Advertisement

नंदलाल कचरू शिंदे पुन्हा अडचणीत राज्य माहिती आयोगासमोर 8 एप्रिलला सुनावणी होऊ शकते मोठी शिक्षा व दंड

रत्नागिरी : अपिलार्थी यांचा दिनांक 7 मे 2015 रोजी माहिती अधिकार अर्ज कोर्ट टिकीटसह फाडण्यात आलेल्या माहिती अर्जाची मूळ सत्य प्रत मिळण्याबाबत प्रकरणी महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आयुक्त, राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांच्या समोर दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.35 वाजता सुनावणी होणार आहे. सुनावणीची नोटीस जन माहिती अधिकारी तथा अधिक्षक शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी ,जन माहिती अधिकारी शिक्षण विभाग पंचायत समिती दापोली जिल्हा रत्नागिरी, प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दापोली जिल्हा रत्नागिरी व अपिलकर्ता सुशिलकुमार जहांगीर पावरा गोल्ड व्हॅली दापोली जिल्हा रत्नागिरी यांना कक्ष अधिकारी मानसी शिंदे महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांनी बजावली आहे. या सुनावणीला जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी यांनी तत्कालीन जनमाहिती अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व संबंधित अधिका-यांनासुद्धा संपूर्ण कागदपत्रे व अभिलेखासह उपस्थित राहण्यास कळवले आहे. 
                 दिनांक 7 मे 2015 रोजी माहिती मागण्यासाठी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दापोली कार्यालयात अर्जदार यांनी माहिती अधिकार अर्ज केला होता,परंतु तो माहिती अधिकार अर्ज नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली, जे.जे.खोत तत्कालीन गटशिक्षणाधिकारी दापोली, अधिक्षक शिक्षण विभाग पंचायत समिती दापोली,हर्षल घाडगे तत्कालीन कनिष्ठ लिपीक शिक्षण विभाग पंचायत समिती दापोली यांनी रागारागाने सुडबुद्धीने फाडला. म्हणून माहिती अधिकारी अर्ज कोर्ट टिकीटसह फाडणा-या दोषी अधिका-यांवर कडक कारवाई करावी, म्हणून अर्जदार सुशिलकुमार पावरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 2 हजारहून अधिक स्मरणपत्रे पाठविली व 240 पेक्षा अधिक वेळा उपोषण केले.पोलीस ठाणे दापोलीत तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. दरम्यान जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशानुसार एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी आरोपीलाच चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करून अहवाल सादर करण्यास सांगितले. मात्र सदर अहवालात मागितलेला गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दापोली कार्यालयातील अर्ज न देता अन्य कार्यालयातला अर्ज दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्या 240 उपोषणांच्या 28 मागण्यांत माहिती अधिकार अर्ज कोर्ट टिकीटसह फाडणा-यां अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, ही मागणी जोर धरू लागली. अखेर राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाने दिनांक 24 एप्रिल 2020 रोजी अपिलार्थी यांनी दाखल केलेल्या द्वितीय अपिल अर्जाची दखल घेत सुनावणी आयोजित केली आहे. 
                अपिलार्थी यांनी या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांना 2 हजारहून अधिक स्मरणपत्रे व 10 हजारहून अधिक पत्रे पाठवूनही दुर्लक्ष केल्याबद्दल तत्कालीन सीईओ व शिक्षणाधिकारी यांना सुद्धा ठपका बसू शकतो.तसेच माहिती अधिकार अर्ज कोर्ट टिकीटसह फाडणा-या संबंधित गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दापोली कार्यालयातील अधिका-यांवर सह आजी ,माजी अशा एकूण 10 अधिका-यांवर ठपका बसून मोठी शिक्षा व दंड होण्याची शक्यता आहे. 
                 यापूर्वी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांची मुळ कागदपत्रे लपवून ठेवले,गहाळ केले प्रकरणी जिल्हा परिषद रत्नागिरीला आयुक्त राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाने तब्बल 2 लाख रूपये दंड ठोठावला होता, त्यामुळे माहिती अधिकार अर्ज कोर्ट टिकीटसह फाडण्याच्या प्रकरणात किती अधिका-यांवर राज्य माहिती आयोग कारवाई करेल,याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments