Advertisement

मानवी हक्क आयोगाने घेतली दखल; नंदुरबार पोलिस कोठडीत सुशिलकुमार पावरा यांना मारहाण प्रकरण


११ आगस्ट २०२६ रोजी सुनावणी; तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त सह ४ पोलिस अधिकारी आरोपी!

नंदुरबार प्रतिनिधी:- जजपेक्षा पोलिसांना जास्त पावर असतो,तो पावर दाखवतो तुला, आमच्या विरोधात तक्रार केली तर याद राख, तुला तडीपार करून टाकीन, मारून टाकीन अशी जीवे ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक, अश्लील व वाईट शिविगाळ करून पोलिस कोठडीत मला अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्याचा प्रयत्न करणा-या नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, हेमंत पाटील पोलिस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार व हेमंतकुमार पाटील पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे नंदुरबार यांच्या वर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा अशा स्वरूपाची तक्रार बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी अध्यक्ष मानवी हक्क आयोग मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या कडे दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल केली होती.त्या तक्रारीची दखल घेऊन राज्य मानवी हक्क आयोग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक ११ आगस्ट २०२६ रोजी सुनावणी लावली आहे.
             विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांना निर्देश दिले आहे की, पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या विरोधातली ही तक्रार असून दिनांक २५/०९/२०२६ ते २९/०९/२०२६ या कालावधीतील पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही खुटेज सह खरा वस्तू स्थिती अहवाल स्वतः मानवी हक्क आयोग मुंबई येथे हजर राहून दिनांक ११ आगस्ट २०२६ रोजी सादर करावा. अहवालाच्या दोन प्रती सह संबंधित जबाबदेही अधिका-यांसह हजर राहावे. चौकशी अहवाल न सादर केल्यास आपणावर योग्य कारवाई मानवी हक्क आयोग करेल,हा आदेश दिनांक २५/०६/२०२६ रोजी माझ्या सही व शिक्क्याने पारीत केला आहे.असा आदेश निबंधक मानवी हक्क आयोग मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांना दिला आहे.या प्रकरणात आरोपीत पोलिस अधिकाऱ्यांवर मानवी हक्क आयोग कोणती कारवाई करेल,याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

0 Comments