Advertisement

सन २००२ मतदार यादीत नावे नसणा-यांचीही मतदार यादीत नावे समाविष्ट करा -बिरसा फायटर्सची मागणी

एसआयआर पडताळणीत लाखों मतदारांची नावे कमी होण्याची शक्यता!

शहादा प्रतिनिधी :- सन २००२ पूर्वी मतदान केलेल्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत नसतील त्यांची इतर कागदपत्रांआधारे मतदार यादीत नावे समाविष्ट करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आयुक्त राज्य निवडणूक आयोग मुंबई महाराष्ट्र, जिल्हाधिकारी नंदुरबार व तहसीलदार शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
                         भारतीय निवडणूक आयोग मतदार ओळखपत्रे अद्ययावत करण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) नावाची एक विशेष मोहीम चालवत आहे. ही प्रक्रिया ऑनलाईनही पूर्ण करता येऊ शकते. एसआयआरअंतर्गत मतदार गणना फॉर्म भरुन सादर करणे आता पूर्णपणे ऑनलाईन आहे. भारतीय निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया सोपी आणि डिजिटल केली आहे. आता voters.eci.gov.in या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येऊ शकते. याद्वारे नोंदणी थेट अपडेट होते. यामुळे घरबसल्या मतदार डेटा व्हेरिफिकेशन आणि दुरुस्ती करणे अत्यंत सोपे झाले आहे.निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि सादर करण्यासाठी मतदार ओळखपत्र आणि मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य केले आहे. प्रत्येक मतदाराने अर्ज भरुन तो बीएलओ किंवा ऑनलाईन पोर्टलवर सबमिट करणे आवश्यक आहे. जर एपिक आधीच लिंक केलेला नसेल तर फॉर्म-८ द्वारे मोबाईल नंबर अपडेट करुन तो त्वरित लिंक करता येईल, असे आयोगाचे म्हणणे आहे.परंतु ज्या लोकांनी २००२ पूर्वी मतदान केल आहे आणि २००२ च्या मतदार यादीत नाव नाही आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात अडचणी येत आहेत.

Post a Comment

0 Comments