Advertisement

मलगाव येथे बिरसा फायटर्सच्या ३८३ व्या गावशाखेची स्थापना; रोहित पटले अध्यक्षपदी




शहादा (प्रतिनिधी): शहादा तालुक्यातील मलगाव येथे बिरसा फायटर्सच्या ३८३व्या गावशाखेची स्थापना करण्यात आली. यावेळी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून *रोहित पटले* यांची *गावशाखा अध्यक्षपदी*, *संजय भामरे* यांची *उपाध्यक्षपदी* आणि *भरत सुळे* यांची *सचिवपदी* नियुक्ती करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे –

१)अध्यक्ष : रोहित पटले
२)उपाध्यक्ष : संजय भामरे
३)सचिव : भरत सुळे
४)सहसचिव : निखिल वसावे
५)प्रवक्ते : जितू भामरे
६)कोषाध्यक्ष : अनुराग पाडवी
७)कार्याध्यक्ष : अभय डीवरे
८)प्रसिद्धी प्रमुख : डामरे हुसेन
९)संघटक : राहुल भामरे
१०)सदस्य : प्यारेलाल भामरे

बिरसा फायटर्सचे *राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे* यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चर्चेनंतर नव्या कार्यकारिणीला एकमताने मान्यता दिली.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, जल-जंगल-जमीन संरक्षण, आदिवासी अस्तित्व व अस्मितेचे जतन, संस्कृतीचे संवर्धन, संविधानिक हक्क व आरक्षणाच्या संरक्षणासाठी तसेच समाजहिताच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बिरसा फायटर्स ही आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, लोकशाही मार्गाने लढा देणारी वैचारिक व सामाजिक संघटना असून समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments