Advertisement

बिरसा फायटर्सचा दणका; राजू पेंढारकर कृषी अधिकारी यांची पदावरून हकालपट्टी!



बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेपासून आदिवासी लाभार्थ्यांस वंचित ठेवले!

शहादा प्रतिनिधी: राजू पेंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेत मनमानी कारभार करून आदिवासी लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवल्या प्रकरणी त्यांना पदावरून तात्काळ हटवा व आदिवासी लाभार्थ्यांस बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेचा लाभ मिळवून द्या, या मागणीसाठी दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी पंचायत समिती शहादा समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी राजू पेंढारकर कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा यांचा शहादा तालुक्यातील बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेचा पदभार काढून घेतला आहे.राजू पेंढारकर यांची शहादा तालुक्यातून धडगांव तालुक्यात उचलबांगडी करण्यात आली आहे.बिरसा फायटर्स संघटनेने आंदोलन रद्द करावे,असे पत्र बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी दिले आहे.
                       राजू पेंढारकर हे आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार करीत आहेत. लाभार्थ्यांच्या विहीरीची पूर्ण चौकशी करीत नाहीत. लाभार्थ्यांस कोणत्याही प्रकारची नोटीस देत नाहीत. परस्पर मुदत संपली म्हणून बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेतून लाभार्थ्यांचे नाव कट करून लाभार्थ्यांस वंचित ठेवतात. शहाणा येथील दोन लाभार्थ्यांस बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेपासून वंचित ठेवले आहे. राजू पेंढारकर यांची शहादा तालुक्यातून हकालपट्टी केली असली तरी आदिवासीं लाभार्थ्यांस बिरसा मुंडा सिंचन विहीर योजनेंचा लाभ मिळाला नाही,तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,लोहाराचे सुरेश पवार दिलीप मुसळदे,नागेश जाधव,अक्षय शेल्टे,कैलास पावरा,जगदीश डुडवे,आकाश तडवी,मुकेश पावरा,उद्या पाडवी,बिंद्या पाडवी,अनिल पाडवी,विनेश पाडवी,किसन वळवी,सुंड्या पाडवी,दादी पाडवी,कमलाबाई पाडवी,रानू वळवी,हिरा पाडवी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments